सुनेने बंदुकीतून गोळी झाडून सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरातील मुबारकनगरात घडलेल्या घडल्याने खळबळ उडाली आहे. या सासू-सुनेत नेहमीच वाद व्हायचा, या वादाला कंटाळून सासूचा खून केल्याचे सांगितले जात आहे. आशा किसनराव पोराजवार (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुनेने बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर मुबारकनगरातील आशा पोराजवार या रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्याने त्यांना उपचारासाठी आर्णीतील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनादरम्यान डॉक्टरांनी त्यांच्या डोक्यातून बंदुकीची गोळी काढली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेल्या घरातील स्वयंपाक खोलातून बंदूक व दोन निकामी काडतूस तर पांच जिवंत काडतूस जप्त केले. 

मृत महिलेवर ज्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली गेली. ती गोळी सेवानिवृत्त सैनिक प्रभू गव्हाणकर यांच्या चोरी गेलेल्या रिव्हॉल्व्हरमधील आहे. याप्रकरणी गव्हाणकर यांनी रिव्हॉल्वहर चोरी गेल्याची तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांकडून शोध सुरू होता. याच दरम्यान, पोलिसांना या मृत महिलेच्या डोक्यातून बंदुकीची गोळी निघाल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली. या घटनेचा तपास केला असता ही तिच चोरी झालेली बंदूक आणि त्याच बंदुकीतून निघालेली गोळी असल्याचं समोर आलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पोलिसांनी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती सहायक पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी दिली.