लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले म्हणून, प्रियकराच्या मदतीने लेकीनेच आईची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना खालापूर तालुक्यात घडली आहे. यानंतर तिने आत्महत्येचा बनाव देखील रचला. मात्र लहान बहिणीने सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर खालापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

संगीता मारुती झोरे (वय ४२) या दोन मुलींसह परखंदे अहिल्यानगर गावात राहत होत्या. मंगळवारी (१० सप्टेंबर) रोजी रात्री जेवून खाऊन त्या तिघीही झोपी गेल्या. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास संगीता यांना अचानक जाग आली. त्यावेळी त्यांची वीस वर्षांची मोठी मुलगी तिच्या प्रियकर आक्षेपार्ह स्थितीत दिसून आली. मुलीचा हा कारनामा पाहून संगीता यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने तिचे तोंड दाबून तिला जमिनीवर पाडले आणि घरातील ब्लँकेट तिच्या तोंडावर दाबून धरले.

आणखी वाचा-Bachchu Kadu : “मतदारसंघ शिवसेनेकडे आणि उमेदवार ठरवतं भाजपा, हा हस्तक्षेप…”, बच्चू कडू यांचा गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलगी भारतीने आई संगीताचे पाय धरुन ठेवले. श्वास कोंडल्याने संगीता यांचा मृत्यू झाला. संगीताचा खून केल्याचा कोणाला संशय येऊ नये म्हणून भारती आणि संतोष यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संगीताचा मृतदेह साडीने घराच्या छताच्या लोखंडी पाईपला लटकवला व त्या ठिकाणी लाकडी स्टुल ठेवून गुन्ह्याचा पुरावा नष्ट केला. परंतू संगीता यांच्या दुसर्‍या मुलीने घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात, भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे व त्यांना १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आलोख खिस्म तपास करत आहेत