scorecardresearch

Premium

सांगली : अवकाळीने द्राक्षाचे नुकसान झाल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, पालकमंत्री सुरेश खाडेंनी कुटुंबाचे केले सांत्वन

कोंगनोळी येथील शेतकरी गुंडा लक्ष्मण वावरे (वय २७) या तरुण शेतकर्‍याने अवकाळीने झालेल्या नुकसानीमुळे गुरुवारी आत्महत्या केली.

Young farmer commits suicide Kongnoli
सांगली : अवकाळीने द्राक्षाचे नुकसान झाल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, पालकमंत्री सुरेश खाडेंनी कुटुंबाचे केले सांत्वन (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

सांगली : काढणीला आलेल्या द्राक्षाला चार किलोला ७०० रुपये उच्चाकी दर निश्‍चित झाला. बाग काढणी सुरू होणार एवढ्यात अवकाळीने धूळधाण केली. काढलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेने ग्रासलेल्या तरुण शेतकर्‍याने आत्महत्या करण्याचा प्रकार कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे घडला. शुक्रवारी या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करीत जास्तीत जास्त मदत शासनाकडून देण्यात येईल असे आश्वस्त केल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शुक्रवारी सांगितले.

गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यात ठाण मांडले असून शुक्रवारअखेर जिल्ह्यात ४ हजार १८५ हे. क्षेत्रावरील फळपिकांचे नुकसान झाले असून कवठेमहांकाळ तालुक्यातील आगाप द्राक्ष बागांची धूळधाण झाली असल्याचे पालकमंत्री खाडे यांनी माध्यमांशी संवाद साधतांना सांगितले. अद्याप पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता असून होणार्‍या नुकसानीची माहिती दररोज सादर करण्याचे आणि अंतिम नुकसानीचा अंदाज पंचनामे करून हिवाळी अधिवेशनापूर्वी सादर करण्याचे आदेश आपण प्रशासनाला दिले असल्याचे सांगितले. यामध्ये सर्वात जास्त नुकसान द्राक्ष पिकाचे झाले असून कवठेमहांकाळ तालुक्यात पोटरीला आलेले ज्वारीचे पिकही भुईसपाट झाले आहे. तर पावसाने द्राक्ष बागा वाचविण्यासाठी औषध फवारणीही अशक्य झाल्याने नुकसानीत वाढ होणार असल्याचे ते म्हणाले.

farmer protest
गुन्हा दाखल झाल्यावरच अंत्यसंस्कार! शुभकरनच्या मृत्यूमुळे संतप्त शेतकऱ्यांचा ‘काळा दिवस’
kolhapur, two murder in kolhapur, kolhapur crime news,
कोल्हापूरात खूनाचे सत्र; कुडित्रेत मद्यपीकडून वृद्धाचा खून, इचलकरंजीत तरुणाची निर्घृण हत्या
The body of a young man who had been missing for the last three days in Vishrambagh was found in the Krishna river sangli
बेपत्ता तरुणाचे पार्थिव कृष्णा नदीत, आत्महत्येचा संशय ?
Malad
माणुसकीला काळिमा! मुंबईत गटारात फेकलेल्या गोणीत सापडलं नवजात बालक, प्राणीप्रेमीच्या ‘या’ कृतीमुळे मिळालं जीवदान

हेही वाचा – सोलापूर : पंढरपुरात विठ्ठलाची प्रक्षाळपुजा संपन्न, नित्योपचार पूर्ववत, देवाचा शिणवटा जावा यासाठी आयुर्वेदिक काढा

हेही वाचा – “२४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा…”, जरांगे-पाटलांनी सरकारला दिला थेट इशारा

कोंगनोळी येथील शेतकरी गुंडा लक्ष्मण वावरे (वय २७) या तरुण शेतकर्‍याने अवकाळीने झालेल्या नुकसानीमुळे गुरुवारी आत्महत्या केली. त्याची एक एकर द्राक्ष बाग असून व्यापार्‍यांनी त्याच्या मालाला चार किलोसाठी ७०० इतका उच्चाकी दर देऊ केला होता. मात्र, अवकाळीने बागच गेली. त्याच्यावर अडीच लाख रुपये कर्ज असून ते कसे फिटणार या विवंचनेत त्यांने आत्महत्या केली. कुटुंबाला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत तातडीची मदत देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे खाडे यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Young farmer commits suicide due to loss of grapes incident at kongnoli ssb

First published on: 01-12-2023 at 20:24 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×