राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील एका तरूणाने मतदान केंद्र शोधण्यासाठी विकसित केलेले मोबाईल अॅप्लिकेशन नवमतदारांसाठी फलदायी ठरू शकते. एरवी मतदारसंघाची पुर्नरचना आणि अन्य तांत्रिक बाबींमुळे निवडणुकीच्या दिवशी स्वत:चे मतदान केंद्र शोधताना धावपळ करावी लागल्याचा अनुभव अनेकांना आला असेल. त्यात पहिल्यांदा मतदान करत असणाऱ्यांसाठी तर सगळेच वातावरण नवीन असल्याने बहुतेकदा त्यांचा गोंधळ उडताना दिसतो. मात्र, श्रीकांत निंबाळकर या नाशिकमधील तरूणाने विकसित केलेले मोबाईल अॅप्लिकेशन या गोंधळावर उत्तम उपाय ठरण्याची शक्यता आहे. माहिती संशोधक असलेल्या श्रीकांतने नुकतेच अमेरिकेतील जोन्स हॉपकिन्स विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
अँड्रॉईड मोबाईलधारक गुगल प्लेस्टोरवर जाऊन ‘मतदार यादी अॅप’ डाऊनलोड करू शकतात. अगदी शेवटच्या क्षणी निवडणूक यादीत नाव नोंदवलेल्या मतदारांना या अॅप्लिकेशनच्या सहाय्याने स्वत:च्या मतदान केंद्राचा क्रमांक आणि पत्ता सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. ‘मतदार यादी अॅप’ उघडल्यानंतर त्यामध्ये मतदाराचा जिल्हा, मतदारसंघ आणि अन्य माहिती भरल्यानंतर एका क्लिकसरशी मतदान केंद्राचा क्रमांक आणि पत्ता मिळु शकतो.
संग्रहित लेख, दिनांक 9th Oct 2014 रोजी प्रकाशित
मराठी तरूणाने विकसित केले मतदान केंद्र शोधण्याचे अॅप!
राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील एका तरूणाने मतदान केंद्र शोधण्यासाठी विकसित केलेले मोबाईल अॅप्लिकेशन नवमतदारांसाठी फलदायी ठरू शकते. एरवी मतदारसंघाची पुर्नरचना आणि अन्य तांत्रिक बाबींमुळे निवडणुकीच्या दिवशी स्वत:चे मतदान केंद्र शोधताना धावपळ करावी लागल्याचा अनुभव अनेकांना आला असेल.

First published on: 09-10-2014 at 01:16 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth develops mobile app for info on polling centre