एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीला नुकतेच एक वर्ष पूर्ण झालं आहे. तरीही, शिवसेनेतील ( ठाकरे गट ) गळती थांबवण्याचं नाव घेत नाही. आता युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. युवासेनेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून राहुल कनाल शिंदे गटात जाणार असल्याचं बोललं जात आहे.

राहुल कनाल यांच्या संभाव्य शिंदे गटातील प्रवेशावर युवासेना नेते, वरूण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जबाबदाऱ्या देण्यात आल्यावर कोणाची नाराजी नव्हती. आता सर्वजण नाराज दिसत आहेत,” असं वरूण सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “हे कोणी केलंय, सर्वांना माहिती, पण…”, शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरु असताना राहुल कनाल यांचं ट्वीट

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वरूण सरदेसाई म्हणाले, “पक्षाकडून वेगळवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. शिर्डी संस्थान, महापालिका शिक्षण समितीवर स्थान दिलं गेलं. तेव्हा कोणाची नाराजी नव्हती. आता सगळ्यांची नाराजी दिसत आहे.”

हेही वाचा : “शरद पवारांनी गुगली टाकली नसती, तर…”, संजय राऊतांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल कनाल यांच्या पक्षप्रवेशावर आमदार मनीषा कायंदे यांनीही भाष्य केलं आहे. “पक्ष चालवत असताना निदान आपल्या कार्यकर्त्यांचे मत, अडचणी ऐकून घेणं ही अपेक्षा असते. ती जर पूर्ण होत नसेल, तर अशाच पद्धतीने कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या गटाला सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येतील,” असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.