लातूर जिल्ह्यातील औसा तालूक्यातील काँग्रेस उमेदवाराच्या महाविद्यालयात दारुच्या बाटल्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. मतदारांना आमिष दाखवण्यासाठी दारु आणल्याच्या आरोपावरुन उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेताळेश्वर भीमाशंकर बावगे असे गुन्हा दाखल झालेल्या उमेदवाराचे नाव आहे.
औसा तालुक्यात काँग्रेसच्या वतीने वेताळेश्वर बावगे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. बावगे यांनी राजीव गांधी पॉलिटेक्निकमध्ये दारुच्या बाटल्या ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांकडून दारुच्या बाटल्यांचे १२ बॉक्स जप्त करण्यात आले.
प्रत्येक बॉक्समध्ये देशी दारुच्या ४८ बाटल्या आढळून आल्या आहेत. बावगेंविरोधात मतदारांना अमिष दाखवण्यासाठी दारु आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zp panchayat samiti election 2017 latur ausa congress leader liquor stock found in college
First published on: 16-02-2017 at 15:19 IST