आज सकाळी पार्लेटिळक शाळेसमोर अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्यासमोर बीएसडब्ल्यूच्या चालकाने अश्लिल चाळे केले. यासंदर्भात चिन्मयी सुमीत यांनी पोलिसांत रितसर तक्रारही नोंदवली होती. ४.१५ च्या सुमारास नोंदवलेल्या तक्रारीनंतर सुमारे दोन तासांत मुंबई पोलिसांनी त्या चालकाला शोधून काढले असून त्याला अटकही करण्यात आली आहे. चिन्मयी यांचे पती सुमीत राघवन यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. सुमीत यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘४.१५ वाजता पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या दोन तासांत मुंबई पोलिसांनी त्या चालकाला पकडले. त्यांच्या या मदतीसाठी मनापासून आभार. असे काही प्रसंग घडल्यास शांत बसू नका. पोलिसांची मदत घ्या.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज सकाळी एका बीएमडब्ल्यू गाडीच्या चालकाने चिन्मयी यांच्यासमोर हस्तमैथून करायला सुरूवात केली. पार्ले टिळक शाळेजवळ ही गाडी उभी होती. चिन्मयी यांनी या विकृत प्रकाराबद्दल त्या व्यक्तिला हटकलेही. त्या मारण्यासाठी त्याला पुढे सरसावल्या असता त्या अज्ञात व्यक्तिने तिथून पळ काढला. या सगळ्या प्रकारात चिन्मयी यांना त्या गाडीचे शेवटचे १९८५ हे ४ नंबरच टिपता आले. त्या चालकाने त्याने राखाडी रंगाचा सफारी घातला होता.

चिन्मयी यांचे पती अभिनेते सुमीत राघवन यांनी घडलेली संपूर्ण घटना ट्विटरवर शेअर केली शिवाय मुंबई पोलिसांकडे मदतीची मागणीही केली होती. यासंदर्भात चिन्मयी यांनी पोलिसांकडे रितसर तक्रारही केली होती. सुमित यांनी मुंबई पोलिसांना ट्विटमध्ये टॅग करत संपूर्ण प्रकार कथन करत या चालकाला लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात चिन्मयी सुमीतला संपूर्ण सहकार्य करत अवघ्या दोन तासात चालकाला गजाआड केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A car driver arrested trying to masturbate in front of actress chinmayee sumeet raghvan at vileparle mumbai
First published on: 19-02-2018 at 21:11 IST