04 December 2020

News Flash

इशान खट्टर पडला २४ वर्ष मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात

श्रीमंत घरातील मुलगा वेश्या व्यवसाय करणाऱ्या माहिलेच्या प्रेमात पडल्यावर काय घडते?

‘धडक’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेला अभिनेता इशान खट्टर याने देखील आता आपले लक्ष इतर बॉलिवूड कलाकारांप्रमाणे वेब सिरीजच्या दिशेने वळवले आहे. इशान लवकरच ‘अ सूटेबल बॉय’ या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी वेब सिरीजचा फर्स्ट लुक लॉन्च करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये इशान त्याच्यापेक्षा वयाने २४ वर्ष मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

First look #ASuitableBoy @bbcone #MiraNair

A post shared by Tabu (@tabutiful) on

या पोस्टरमध्ये दिसणारी अभिनेत्री तब्बू आहे. ‘अ सूटेबल बॉय’मध्ये ती मुख्य अभिनेत्रीच्या रुपात झळकणार आहे. तब्बूनेच सोशल मीडियावर या आगामी वेब सिरीजचे पोस्टर शेअर केले.

या वेब सीरिजमध्ये ईशान कॉलेजमधील एका विद्यार्थ्याची भूमिका साकारणार आहे. तर तब्बू देहविक्री करणारी महिला सादर करत आहे. श्रीमंत घरातील मुलगा वेश्या व्यवसाय करणाऱ्या माहिलेच्या प्रेमात पडल्यावर काय घडते? हे ‘अ सूटेबल बॉय’मध्ये दाखवले जाणार आहे. जून २०२०मध्ये ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 7:22 pm

Web Title: a suitable boy first look ishaan khatter is mesmerised by tabu mppg 94
Next Stories
1 जर मी वेळीच तेथून निघाले नसते तर…, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
2 मिताली राजच्या बायोपिकची घोषणा; ‘ही’ बोल्ड अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका
3 … म्हणून ‘मर्दानी’ ठरला हिट, राणीने सांगितलं गुपित
Just Now!
X