बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनेमुळे चर्चेत असतो. मग ते ‘दंगल’ चित्रपटासाठी वाढवलेले वजन असो किंवा एखाद्या जाहिरातीसाठी बदलेला लूक असो. आमिरने ‘दंगल’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या व्हिडिओमुळे अनेकांना प्रेरणाही मिळाली होती. आमिर त्याच्या आरोग्याची फार काळजी घेत असल्याचे पहायला मिळते.

नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात आमिरला आरोग्यासंबंधीत अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. या वेळी मोठमोठ्या पार्टीमध्ये जातो तेव्हा तेथील जेवण जेवतो का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावर आमिरने उत्तर दिले की, ‘मी माझ्या जेवणाचा डब्बा सगळीकडे घेऊन फिरतो. जर कधी जमलेच तर शाहरुखला या बाबत विचारा, तो आमचे काही किस्से सांगेन.  टिम कुक शाहरुखला भेटण्यासाठी त्याच्या घरी आले तेव्हा शाहरुखने मला देखील जेवणाचे आमंत्रण दिले होते. गौरीने सगळ्यांना जेवयला बोलवले आणि आम्ही सगळ्यांनी जेवणाची तयारी केली. त्यानंतर तिने जेवण वाढायला सुरुवात करताच मी म्हणालो की मी माझा डब्बा आणलाय’ हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. आमिरचा डब्बा पाहताच शाहरुख थक्क झाला. आमिर वजन वाढवत आहे की कमी करत आहे हा प्रश्न शाहरुख समोर उभा राहिला होता.

https://www.instagram.com/p/Bvhq-rshISS/?utm_source=ig_web_copy_link

ही घटना ‘दंगल’ चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी घडली होती. तसेच त्या दरम्यान त्याला चित्रपटासाठी वजन वाढवायचे असल्याने आमिर जास्त आहार घेत असल्याचा खुलासा त्याने केला आहे. प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय मिळून देण्यासाठी आमिर स्वत:ला त्या भूमिकेत झोकावून देत असल्याचे पहायला मिळते.

आता अमिरचा ‘लाल सिंग चढ्ढा’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे आमिरने त्याच्या ५४ व्या वाढदिवशी सांगितले. तसेच हा चित्रपट प्रसिद्ध हॉलीवूडपट ‘फॉरेस्ट गम्प’चा अधिकृत रिमेक असणार आहे असेही तो म्हणला.