News Flash

..या चित्रपटाच्या निमित्ताने आमिर आणि नागराज एकत्र येणार?

चित्रपटाच्या निमित्ताने जर हे दोघेही एकत्र आले तर, चित्रपटरसिकांसाठी एक पर्वणीच असेल

'सैराट' हा चित्रपट आमिर खानला फारच भावला होता.

‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या चर्चेत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने विविध विक्रम मोडित काढत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘पिस्तुल्या’, ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ यांसारखे तगडे चित्रपट देत नागराज मंजुळेने राष्ट्रीय पुरस्कारांवरही छाप उमटवली आहे. नागराज मंजुळेच्या कामाने भारावलेला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसुद्धा येत्या काळात त्याच्यासह काम करणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे.

आमिर आणि नागराज मंजुळे एकत्र काम करणार असल्याच्या चर्चांमुळे सध्या चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या निमित्ताने जर हे दोघेही एकत्र आले तर, चित्रपटरसिकांसाठी एक पर्वणीच असेल अशी आशा सध्या वर्तवली जात आहे. नागराज मंजुळेचा ‘सैराट’ हा चित्रपट आमिर खानला फारच भावला होता. ‘या चित्रपटाचा शेवट मन हेलावून टाकणारा आहे’, असे म्हणत आमिरने या चित्रपटाचे कौतुकही केले होते. त्यामुळे नागराजच्या कामाची प्रशंसा करणारा आमिर आता त्याच्यासोबत काम करणार असल्याच्या चर्चा चित्रपट वर्तुळामध्ये रंगत आहेत.

दरम्यान ‘सैराट’ चित्रपटाची लोकप्रियता पाहता कन्नड भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. कन्नड भाषेतील ‘सैराट’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले असून त्या चित्रपटातही रिंकु राजगुरुच आर्चीच्या भूमिकेत दिसणार आसल्याची चर्चा आहे. आमिर खानही सध्या त्याच्या आगामी ‘दंगल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. आमिर या चित्रपटामध्ये कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारत आहे. २३ डिसेंबरला आमिरचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 5:05 pm

Web Title: aamir khan to collaborate with sairat director
Next Stories
1 स्वप्निल जोशी झाला व्यसनाधीन?
2 सामान्यांना ‘ऐ दिल है….’ पाहणे ‘मुश्किल’?
3 VIDEO: जेव्हा प्रियांका चोप्रा ‘अॅलेन डिजेनेर्स’च्या कार्यक्रमात टकीला शॉट मारते..
Just Now!
X