अभिनेत्री अनू अगरवालची जीवनकथा अगदी हेलावून टाकणारी आहे. अनू ही एक मॉडेल होती आणि तिला समाजसेविका व्हायचं होतं. ती ‘आशिकी’ या चित्रपटानंतर रातोरात स्टार झाली. तिचा हा चित्रपट तुफान गाजला. त्या काळात जेव्हा गोरेपणा हेच सौंदर्य मानलं जायचं, तेव्हा ती याला अपवाद ठरली. काही वर्षांनंतर तिने योगाभ्यास करण्यासाठी या दुनियेला रामराम ठोकला.

तिच्या आयुष्यात तिला जीवघेण्या अपघाताला सामोरं जायला लागलं. भल्या पहाटे पावसाळ्याच्या दिवसात मुंबईच्या चौपाटी परिसरात तिचा मोठा अपघात झाला. या अपघातानंतर तिचं शरीर अक्षरशः खिळखिळं झालं होतं आणि ती तब्बल २९ दिवस कोमामध्ये होती. तिने आपल्या या अपघाताबद्दल आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल भाष्य केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by anu aggarwal (@anusualanu)

एका मुलाखतीत ती म्हणते, “१९९९मध्ये माझा अपघात झाला आणि मी कोमामध्ये गेले. अपघातापूर्वी मी एका आश्रमात राहायचे आणि तिथे माझं एक आध्यात्मिक नावही होतं. त्या अपघातानंतरचं मला काहीच माहित नाही पण मला माझं ते नाव मात्र माहित आहे. २००१ साली मी संन्यास घेतला आणि पूर्ण टक्कल करण्याचा निर्णय घेतला आणि मानवी मानसिकता समजून घेण्यासाठी, मानवी मनाचा अभ्यास करण्यासाठी निघून गेले.”

ती पुढे म्हणते, “२००६ साली मी परत आले आणि लोकांना भेटू लागले. माध्यमांनीही माझी दखल घेतली, मी त्यांनाही शांतपणे भेटले”. ती टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत देताना बोलत होती. ती पुढे म्हणाली, “अपघातानंतर मी लिपस्टिक कशी लावतात हेही विसरले होते. लोकांनी माझे आधीचे आणि आत्ताचे फोटो व्हायरल करायला सुरुवात केली. माझा नो मेकअप लूक व्हायरल होऊ लागला. मला विश्वासच बसत नव्हता हे सगळं माझ्यासोबच होत आहे.”

अभिनेत्री अनू अगरवाल ‘आशिकी’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने ‘खलनायिका’ या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली होती. यात तिच्यासोबत अभिनेते जितेंद्र, अभिनेत्री जयाप्रदा, मेहमूद, वर्षा उसगावकर हे कलाकार होते.