News Flash

VIDEO : मद्यधुंद अवस्थेत मोदींविरोधात बरळला हा अभिनेता

वादग्रस्त वक्तव्य केल्याने हा व्हिडिओ सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे.

अभिनेता एजाज खान (संग्रहित छायाचित्र)

टेलिव्हिजन रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मुळे प्रसिद्धीस आलेला अभिनेता एजाज खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एजाजने वादग्रस्त वक्तव्य केल्याने हा व्हिडिओ सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे.

गेल्या काही काळापासून एजाज भाजप सरकारसोबतच नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्रमक झाल्याचे चित्र आहे. याआधी गोरक्षणाच्या नावाखाली मुसलमानांची हत्या होत असल्यामुळे त्याने मोदी आणि आदित्यनाथ यांच्याबद्दल राग व्यक्त केला होता. त्यानंतर आता एजाजने असे काही वक्तव्य केलेय की ज्यामुळे वाद उद्भवण्याची शक्यता आहे. १४ सप्टेंबरला त्याने एक फेसबुक लाइव्ह केले. या व्हिडिओत त्याने दाऊदची बहिण हसीनाच्या मुलाच्या लग्नात गाणे गायल्याचेही सांगितले. इतकेच नव्हे तर त्याने ते गाणे म्हणून दाखविले.

वाचा : Revealed ‘टायगर जिंदा है’, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’, ‘सुई धागा’, ‘संदीप और पिंकी फरार’ या दिवशी होणार प्रदर्शित

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एजाजच्या हातात सिगारेट दिसते. त्याच अवस्थेत तो मध्येच पंतप्रधानांचे नाव घेत होता. गाताना तो, ‘कोई तुझको मारे उससे पहले उसको मार दे, साले के भेजे में ६ की ६ उतार दे, टेंशन जैसी चीज लेने का नहीं..डर के मोदी से जीने का नहीं, हक छीन लाने का.. डेयरिंग दिखाने का फैलाने का नहीं झोली.. दे गोली’, असे म्हणताना दिसतो. एजाजचा हा व्हिडिओ आतापर्यंत दोन लाखापेक्षाही अधिक लोकांनी पाहिला असून, अडीच हजार लोकांनी शेअर केला आहे.

वाचा : तामिळनाडूमधील राजकारणात मला बदल घडवायचाय – कमल हसन

टॉलिवूड ते बॉलिवूडमध्ये काम करणारा एजाज ‘बिग बॉस’मध्ये बराच प्रसिद्ध झाला होता. तो त्यावेळी बिग बॉसचा विजेता होऊ शकला नाही. पण, त्याने ज्याप्रकारे घरात आपले स्थान बळकट केले होते त्यामुळे त्याची प्रशंसा करण्यात आलेली. इतकेच नव्हे तर शोचा सूत्रसंचालक सलमान खान यानेही त्याची प्रशंसा केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 12:23 pm

Web Title: actor ajaz khan facebook live video against bjp
Next Stories
1 ..आणि आजींनी तिच्यासोबत सेल्फी काढला
2 ‘रुद्रम’ ग्राफिकल मालिका स्वरुपात
3 ‘या’ अभिनेत्रीने सलमानला सहा वेळा केलं रिजेक्ट
Just Now!
X