नवाजुद्दीन सिद्दकी बॉलिवूडमधील लोकप्रिय नाव. नवाजने आतापर्यंत काही निवड चित्रपटांची निवड केली असून त्याचे हे सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले आहेत. त्यामुळेच दर्जेदार अभिनयाची निवड करणारा कलाकार म्हणून तो ओळखला दातो. सुरुवातीला लहान भूमिका साकारणारा नवाज आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. नवाज लवकरच आगामी ‘फोटोग्राफ’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नवाज त्याच्या आयुष्यातील अनेक घटना चाहत्यांसोबत शेअर करत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या स्ट्रगलिंगच्या काळातील काही आठवणी सांगितल्या आहेत.

बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी नवाजने प्रचंड मेहनत घेतली असून त्याने या क्षेत्रात येण्यासाठी मिळेत ते काम करण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे त्याने सुरुवातीला फोटोग्राफरच्या भूमिकेसाठी पहिलं ऑडिशन दिलं होतं. यासाठी त्याने त्याचा फोटोही चित्रपट निर्मात्यांकडे पाठविला होता. मात्र त्याला रिजेक्ट करण्यात आलं होतं.

“लहानपणापासून एक अभिनेता व्हायचं हे स्वप्न उराशी बाळगून मी त्या दिशेने प्रवास करत होतो. या क्षेत्रात येण्यासाठी बॉलिवूडशी संबंधित जी काही काम मला मिळत होती ती करायला मी तयार होतो. सुरुवातीला चित्रपटातील लहानसहान भूमिकेसाठी मी ऑडिशन देत होतो.याच काळात एका चित्रपटातील फोटोग्राफरच्या भूमिकेसाठी मी माझा फोटो पाठवला होता. विशेष म्हणजे मला ऑडिशनसाठी बोलावण्यातही आलं. मात्र नंतर रिजेक्ट केलं”, असं नवाजने सांगितलं.

दरम्यान, ‘फोटोग्राफ’ चित्रपटाच्या निमित्ताने नवाजने त्याच्या या जुन्या आठवणींना उजाळा दिला. या चित्रपटामध्ये नवाजसोबत अभिनेत्री सान्या मल्होत्रा स्क्रीन शेअर करणार आहे. फोटोग्राफ हा चित्रपट धारावीमधील एका फोटोग्राफरच्या जीवनावर आधारित असून नवाजचा रितेश बत्रा यांच्यासोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. तर सान्या पहिल्यांदाच नवाजसोबत पहिलाच चित्रपट आहे. सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचं वर्ल्ड प्रीमियर झाले असून बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्येदेखील हा चित्रपट दाखविण्यात आला आहे.