बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाख्री आणि अभिनेता उदय चोप्रा यांचा ब्रेकअप चर्चेचा विषय राहिला होता. व्हॉट्स अॅप मेसेजवरून उदयने नर्गिससोबत ब्रेकअप केला होता. त्यावेळी नर्गिस लगेचच उदयला भेटण्यासाठी रातोरात अमेरिकेला रवाना झाली होती. तिने त्यांचे नाते सुधारण्याचा आणि टिकवण्याचा बराच प्रयत्न केला होता. यासाठी तिने तिच्या चित्रपट निर्मात्यांनाही अडचणीत टाकले होते. या संपूर्ण घटनेला आता आठ महिने उलटले आहेत. त्यानंतर आता उदयला बहुदा त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीची आठवण सतावत असल्याचे दिसते.
उदय लवकरच रोमला जाणार असून त्याने नर्गिसला त्याच्यासोबत येणार का ? असे विचारले आहे. उदय चोप्राने ट्विट केलेय की, ‘मी एप्रिल महिन्यात रोमला जात आहे. नर्गिस तू माझ्यासोबत येणार का?’. या ट्विटमध्ये नर्गिसचे ट्विटर हॅण्डल त्याने टॅग केले आहे. उदयचे हे ट्विट पाहता त्याला नर्गिसची आता आठवण सतावतेय असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्याला आता कदाचित पुन्हा तिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये येण्याची इच्छा असावी असे आता म्हटले जातेय. नाही तर, त्याने नर्गिसला आपल्यासोबत इतक्या लांब येण्यासाठी का विचारले असेल, असेही गॉसिप बॉलीवूडमध्ये केले जातेय.
https://twitter.com/udaychopra/status/827122614531354625
उदय चोप्रासोबत ब्रेकअप झाल्यानंतर नर्गिस खूप चिंताग्रस्त होती. इतकेच नव्हे तर काही महिने तिने नैराश्यात घालवल्याचे म्हटले जाते. पण, आता ती ब्रेकअपमधून पूर्णपणे बाहेर आली आहे. तिने नव्याने आपल्या आयुष्याला सुरुवात केल्याचे तिच्या इन्स्टाग्राम अकाउन्टवर नजर टाकल्यास दिसते.
https://www.instagram.com/p/BPS6EwbBZB-/