News Flash

चक्क बाथ्रोबमध्ये गोवा-मुंबई विमान प्रवास? अभिनेत्याचे कृत्य पाहून नेटकरी हैराण

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा अभिनेता 'कुमकुम भाग्य' मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहे.

‘कुमकुम भाग्य’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता झीशान खान नेहमीच चर्चेत असतो. झीशान हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. झीशानने यावेळी बाथ्रोब घालून गोवा ते मुंबई असा विमान प्रवास केल्याने चर्चेत आलेला आहे. याचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

झीशानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत झीशान विमानतळावर बाथ्रोबमध्ये असल्याचे दिसतं आहे. तो त्याच्या काही मित्रांसोबत आहे. याचा पूर्ण व्हिडीओ त्याने त्याच्या ‘Zsquad Vlogs’ या युट्युब चॅनलवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zeeshan Khan (@theonlyzeeshankhan)

आणखी वाचा : ‘दोन मुलांची आई असल्याने मला काम मिळतं नाही..’, अभिनेत्रीने केला खुलासा

‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत झीशानने बाथ्रोबमध्ये प्रवास केल्याचा अनुभव सांगितला आहे. “बरं मला असं वाटतं की आपल्याकडे एकच आयुष्य आहे आणि आपण त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी बाथ्रोब घालणे अयोग्य आहे असे कोण बोलतं. मला काही वेगळं वाटत नाही तर तुम्हाला का वाटायला हवे? आणि मला जे पाहिजे ते करायला मला आवडते. कारण माझ्यासाठी एकच आयुष्य आहे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी मी इथे आहे,” असे झीशान म्हणाला.

आणखी वाचा : Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स

त्याचा हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. एक नेटकरी हसत म्हणाला, ‘झीशान खरचं तू वेडा आहेस, तू काहीही करू शकतोस.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘झीशान अरे काय करतोस तू.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘पूर्ण व्हॉल्ग पाहण्यासाठी मी उत्साही आहे.’

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2021 12:27 pm

Web Title: actor zeeshan makes heads turn as he takes a goa mumbai flight in a bathrobe see what netizens wants to say about him dcp 98
Next Stories
1 सरू आजी अंध नाही? ‘देवमाणूस’ मालिकेत रंजक वळण
2 हे कधी झालं? ‘मुन्ना भाई MBBS’मधील सर्किटने कॉलेजच्या नर्सशीच केले होते लग्न?
3 “राजा हिंदुस्तानीमधील किसिंग सीन देताना मी थरथरत होते”,करिश्माने केला होता खुलासा
Just Now!
X