News Flash

अमिषा पटेलला अटक होणार ?

अमिषावर २.५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे

अमिषा पटेल

‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेल पुन्हा एकदा अडचणीमध्ये आली आहे. एका चित्रपट निर्मात्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी रांची न्यायालयाने तिच्याविरुद्ध वॉरंट जारी केलं आहे. अमिषावर २.५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप एका निर्मात्याने केला आहे.

एका चित्रपट निर्मात्याने अमिषा आणि तिच्या बिझनेस पार्टनरवर २.५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आला. एका चित्रपटासाठी या दोघांनी तक्रारदाराकडून पैसे घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी अमिषाने दोन चेक दिले, मात्र हे दोन्ही चेक बाऊन्स झाले. चेक बाऊन्स झाल्यानंतर तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी न्यायालयामध्ये सोमवारी सुनावणी करण्यात आली. न्यायालयाने अमिषाविरोधात वॉरंट जारी केलं आहे. त्यासोबतच या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ सप्टेंबर रोजी होणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.

‘देसी मॅजिक’ या चित्रपटासाठी अमिषा आणि कुणालने चित्रपट निर्माते अजय कुमार सिंह यांच्याकडून २.५ कोटी रुपये घेतले होते. २०१३ साली या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती आणि २०१८ साली हे चित्रीकरण पूर्ण होणार होतं. या चित्रपटातून मोठा फायदा होणार असून अमिषाने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर व्याजासह संपूर्ण पैसे परत देणार होती. मात्र अमिषाने अद्यापही हे पैसे परत केले नाहीयेत, असं अजय कुमार यांनी सांगितलं.

दरम्यान, अमिषाचा हा चित्रपट आजतागायत प्रदर्शित झाला नाही. याविषयी तिच्याकडे विचारणा केल्यावर तिने ३ कोटी रुपयांचा चेक दिला होता. मात्र तो बाऊन्स झाला. इतकंच नाही तर या प्रकरणी तिला जाब विचारल्यावर तिने थेट पैसे देणार नसल्याचं सांगितलं. त्यासोबतच काही दिग्गज कलाकारांसोबतचे फोटो दाखवत धमकी दिली. त्यानंतर याप्रकरणी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं मला पुन्हा सांगण्यात आलं. परंतु याबाबत अधिक कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही, असं अजय कुमार सिंह यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 11:09 am

Web Title: actress ameesha patel in trouble can go to jail ssj 93
Next Stories
1 ‘मोदीजी वाघांच्या संरक्षणासाठी काहीतरी करा’, रणदीप हुड्डाने केली विनंती
2 ‘ललित’ने जीवनकलेचं भान दिलं
3 नेटकऱ्याने तापसीला म्हटलं ‘वाईट अभिनेत्री’; तिचं उत्तर वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल
Just Now!
X