News Flash

‘या सगळ्या गोष्टी सोप्या नाही,’ ४० व्या वर्षी आई होणाऱ्या किश्वरने सांगितला गरोदरपणाचा अनुभव

पाहा व्हिडीओ

(Photo credit : kishwer merchant instagram)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री किश्वर मर्चंट ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. घर कसे सजवायचे पासून घरातच कॉफी टेबल कसा बनवायचा असे अनेक व्हिडीओ ती शेअर करते. काही दिवसांपूर्वीच किश्वरने ती गरोदर असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. आता तिने गरोदर पणात कसे बदल होतात ही माहिती देण्यासाठी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

किश्वरने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने सगळ्या अडचणींबद्दल सांगितले आहे. “इन्स्टाग्रामवर आपण सगळ्या गरोदर स्त्रीयांना आनंदी पाहतो. मात्र, खऱ्या आयुष्यात त्या तश्या नसतात. गरोदर पणात शरीरात अनेक बदल होतात. माझ्यासोबत ही असे बदल झाले आणि त्या बदलांसाठी मी मुळीच तयार नव्हती. मी या आधी कधी आजारी पडली नाही, पण आता सगळं बदलतं आहे,”असे किश्वर म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishwer M Rai (@kishwersmerchantt)

पुढे तिच्या आजारांबद्दल सांगत ती म्हणाली, “जेव्हा मला समजलं की मी गरोदर आहे. त्यानंतर मला समजलं की मला थायरॉईड सुद्धा आहे. गरोदरपणात थायरॉईड होणं ही साधारण गोष्ट आहे. त्यानंतर मला हॅमरॉईड असल्याचे समजले हे देखील गरोदरपणात साधारण आहे. मात्र, गरोपणात या सगळ्याचा अधिक त्रास होतो. त्यामुळे स्त्रीयांना जास्त त्रास सहन करावा लागतो. हे सगळं मी अशा स्त्री यांसाठी सांगते ज्या गरोदर आहेत आणि त्यांना माझ्या सारखं गरोदरपणा बद्दल काही माहित नाही. हे ऐकल्यानंतर त्या स्वत:ची काळजी घेऊ शकतील.”

पुढे गरोदर असताना स्वभावर कसा होतो आणि काय खालं पाहिजे आणि काय नाही हे देखील किश्वरने सांगितलं आहे. “या दिवसांत खूप चिडचिड होते. राग येतो मध्येच हसायला येतं. मी स्वतः माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. सोबतच जेव्हा पण मी आंबा किंवा तूप खातानाचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकते तेव्हा अनेक लोक त्याच्यावर प्रतिक्रिया देतात आंबे खाऊ नयेत किंवा तूप शेवटच्या तीन महिन्यांमध्ये खावं, पण असं नाहीये. मी माझ्या आईला आणि डॉक्टरांना विचारलं आहे. आंबे खाल्याने कोणताही त्रास होत नाही. शरीरात आणि स्वभावात अनेक बदल होतात. अशा वेळेस तुम्हाला तुमच्या पार्टनरची खूप गरज असते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishwer M Rai (@kishwersmerchantt)

किश्वर आणि सुयशने मार्च महिन्यात ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना दिली. ऑगस्ट महिन्यात किश्वर तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 5:37 pm

Web Title: actress kishwer merchant opens up about health problems and said its not easy dcp 98
Next Stories
1 विकी कौशल पाठोपाठ अभिनेत्री कतरिना कैफला देखील करोनाचा संसर्ग
2 Video: अन् अभिनेत्याने रागात हिसकावून घेतला चाहत्याच्या हातातील फोन
3 करोनावर मात केल्यानंतर कार्तिक आर्यनने खरेदी केली नवी कार, किंमत वाचून व्हाल थक्क
Just Now!
X