News Flash

२० वर्षांनंतर शत्रुघ्न- धर्मेंद्र करणार एकत्र काम

मागील आठवड्यामध्येच या दोघांनी चित्रपटातील काही भागाचं चित्रीकरण पूर्ण केलं.

२० वर्षांनंतर शत्रुघ्न- धर्मेंद्र करणार एकत्र काम
शत्रुघ्न सिन्हा - धर्मेंद्र

‘दोस्त’, ‘लोहा’, ‘जितने नहीं दुंगा’ या सारख्या हिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या जोडीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. विशेष म्हणजे त्यांचे सारेच चित्रपट त्याकाळी विशेष गाजले. मात्र कालांतराने या जोडीने चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला. असं असलं तरी अभिनेता धर्मेंद्र वर्षाकाठी एखादं-दोन चित्रपटामध्ये झळकले होते. त्यामुळे आता या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्याची इच्छा चाहत्यांची होती. यासाठीच धर्मेंद्र यांच्या आगामी चित्रपटामध्ये ही जोडी एकत्र झळकणार आहे.

काही वर्षांपूर्वी ‘यमला पगला दिवाना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद लाभला. आता या चित्रपटाचा सिक्वल ‘यमला पगला दिवाना फिर से’ प्रदर्शित होणार होता. ‘यमला पगला दीवाना फिर से’ या चित्रपटाच्या माध्यमातून धर्मेंद्र आणि शत्रुघ्न ही जोडी तब्बल २० वर्षानंतर स्क्रिन शेअर करणार आहे. मागील आठवड्यामध्येच या दोघांनी चित्रपटातील काही भागाचं चित्रीकरण पूर्ण केलं असून सेटवरील काही फोटो व्हायरल झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या या फोटोंमधून धर्मेंद्र एका वकीलाची भूमिका करणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

दरम्यान, मुल्क चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटामध्ये कोर्ट रुम ड्रामा दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात धर्मेंद्र आणि शत्रूघ्न सिन्हा यांच्या व्यतिरिक्त सनी देओल आणि बॉबी देओलदेखील झळकणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2018 4:34 pm

Web Title: after 20 yrs dharmendra and shatrughan sinha reunite
Next Stories
1 दोन वर्षांनंतर अरबाजच्या आयुष्यात परतलं प्रेम, लवकरच देणार कबुली?
2 संभाजीराजे जागे व्हा! घेराव घालत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी
3 इरफान खानशिवाय ‘कारवां’च प्रमोशन अपूर्ण -मिथीला पालकर
Just Now!
X