News Flash

Deepika-Ranveer : लग्नानंतर ‘हा’ असेल दीपिका- रणवीरचा आशियाना?

नोव्हेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीर लग्नगाठ बांधणार असले तरीही त्यांच्या लग्नाविषयी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

deepika ranveer
दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, deepika ranveer

गतवर्षीच्या अगदी शेवटच्या महिन्यापासून कलाविश्वामध्ये सुरु झालेले लग्नाचे वारे काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी लग्नगाठ बांधल्यानंतर आणखी एका सेलिब्रिटी कपलच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला. ते सेलिब्रिटी कपल म्हणजे बी- टाऊनचे ‘बाजीराव- मस्तानी’ अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग Deepika-Ranveer .

रणवीर आणि दीपिका नोव्हेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकण्याची चिन्हं असून, त्यांच्या लग्नाच्या तयारीलाही सुरुवात झाल्याचं कळत आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिकाला तिच्या आईसोबत एका दागिन्यांच्या दुकानातून बाहेर येताना पाहिलं गेलं होतं. जेव्हापासून या चर्चांनी जोर धरला. आता त्यांच्या लग्नाशीच निगडीत आणखी एक माहिती समोर आली आहे. ती माहिती आहे रणवीर आणि दीपिकाच्या भावी घराविषयीची. लग्नानंतर हे सेलिब्रिटी जोडपं कुठे संसार थाटणार याविषयीच अनेकांमध्ये कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळालं.

‘मिड डे’मध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रणवीरने तो सध्या राहत असलेल्या खार येथील इमारतीतच दोन मजले खरेदी केले आहेत. रणवीर सध्या त्या इमारतीत त्याच्या कुटुंबासमवेत राहतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दोन्ही मजल्यांवर सध्या नुकनीकरणाचं काम सुरु असून, दीपिका त्याची पाहणी करणार आहे. लग्नानंतर राहण्यासाठी कुटुंबियांपासून दूर न जाता त्यांनाही तितकाच वेळ देण्यासाठीच ‘दीप- वीर’ आग्रही आहेत असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : …म्हणून आलिया- रणबीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार नाहीत

नोव्हेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीर लग्नगाठ बांधणार असले तरीही त्यांच्या लग्नाविषयी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. किंबहुना खुद्द दीपिका आणि रणवीरनेही त्यांच्या नात्याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. असं असलं तरीही बी- टाऊनमध्ये त्यांच्या बहुप्रतिक्षित लग्नाच्याच चर्चांना उधाण आलंय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. डेस्टिनेशन वेडिंगमध्ये कल्ला केल्यानंतर दीपिका आणि रणवीर त्यांच्या मित्रपरिवारासाठी ग्रँड रिसेप्शन देणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबई आणि बंगळुरू येथे हे रिसेप्शन पार पडणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2018 12:11 pm

Web Title: after marriage bollywood actress deepika padukone and actor ranveer singh plan to live close to his parents place reports
Next Stories
1 धार्मिक भावना दुखावल्याची नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावाविरोधात तक्रार
2 …म्हणून शाहरुख पाकिस्तानात जाणार?
3 बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीमध्ये बॉलिवूडची मांदियाळी
Just Now!
X