लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनून जातात. त्यामुळे मालिकेत येणारे चढ-उतार हे चवीने पाहिले जातात आणि नंतर सोशल मीडियावर त्याची चर्चाही होते. सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई’. या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आणि आता त्यात येणारी वळणं सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरत आहेत. होळीनिमित्त मालिकेत एक मोठी घडामोड दाखवण्यात आली. ज्यामध्ये आसावरी (निवेदित सराफ) सोहमला (आशुतोष पत्की) कानाखाली मारते. मालिकेत दाखवलेल्या या दृश्याचा जल्लोष प्रेक्षक सोशल मीडियावर करताना दिसत आहेत.
शेवटी एकदाची बबड्याला कानाखाली मारली त्याच्या आईने…संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाची लहर असं एका नेटकऱ्याने लिहिलं आहे. तर अनेकांनी शुभ्राच्या अभिनयाचंही कौतुक केलं आहे.
धुळवडीची मज्जा सुरू असतानाच शुभ्रा ही सोहम आणि प्रज्ञाला एकत्र पाहते. सोहम आणि प्रज्ञा एकाच रुममध्ये असतात आणि तितक्यात शुभ्रा त्यांना पाहते. सोहमला ती याचा जाबही विचारते. यावेळी सोहम आणि शुभ्रा यांच्यात बाचाबाची होते. शुभ्राला कानाखाली मारण्यासाठी सोहम हात उचलतो, तितक्यात आसावरी सोहमला थांबवते आणि त्याच्या कानशिलात लगावते. आसावरीचा हा रुद्रावतार पाहून सर्वचजण चकीत होतात.
मालिकेत आसावरीची भूमिका निवेदिता सराफ साकारत आहेत. तर त्यांच्यासोबत गिरीश ओक, तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की व रवी पटवर्धन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 12, 2020 11:51 am