News Flash

तन्मय भट्टच्या ट्विटला प्रियांकाचे सणसणीत उत्तर..

क्षणार्धातच तन्मयने त्याच्या ट्विटरबाजीला आवरते घेतले

प्रियांका चोप्रा

‘एआयबी’ या युट्युब चॅनलची अशी ना तशी चर्चा होतच असते. त्यातच या चॅनलचा मुख्य भाग असणारा तन्मय भट्ट याने नुकतेच त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन अभिनेत्री प्रियांका चोप्राला निशाणा करत एक ट्विट केले होते. पण सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या वेगवान माध्यमांतून हे ट्विट प्रियांकापर्यंत पोहोचले. तन्मयच्या या ट्विटला अगदी त्याच्याच शैलीत उत्तर देत प्रियांकाने त्याला सणसणीत चपराकच मारली आहे.
बॉलिवूडमागोमाग आता हॉलिवूडमध्येही नावाजलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बोलण्याच्या शैलीवर खिल्ली उडवत तन्मय भट्टने ट्विटरवरुन टिवटिव केली होती. पण, तन्मयला प्रियांकाने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे त्याची फजितीच झाली. प्रियांकाच्या ट्विटचा सूर लक्षात घेत क्षणार्धातच तन्मयने त्याच्या ट्विटरबाजीला आवरते घेतले. अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या या सडेतोड उत्तरामुळे तन्मय भट्ट भांबावून गेला असेल यात शंकाच नाही. याआधी तन्मय भट्टवर काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या ‘सचिन व्हर्सेस लता मंगेशकर’ या चित्रफितीमुळे सर्वच माध्यमांतून टीकची झोड उठवण्यात आली होती. हे असे संदर्भहिन ट्विट आणि व्हिडिओ करायाच्या तन्मय भट्टच्या सवयीवरुन त्याला यापूर्वीही अनेकांनी फटकारले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 1:21 pm

Web Title: aib fame tanmay bhat mocked priyanka chopra on twitter
Next Stories
1 ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार ‘रुस्तम’चा थरार
2 सुनील बर्वे यांच्या ‘हर्बेरियम’चे नवे पान ‘अमर फोटो स्टुडिओ’!
3 संयुक्त राष्ट्राच्या जागतिक नागरिक महोत्सवाची होस्ट प्रियांका चोप्रा
Just Now!
X