News Flash

ऐश्वर्या व आराध्या बच्चन यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

अभिषेक बच्चनने ट्विटरवर याविषयीची मााहिती दिली.

ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व तिची आठ वर्षांची मुलगी आराध्या यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या दोघींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून अभिषेक बच्चनने ट्विटरवर याविषयीची मााहिती दिली. त्याचसोबत त्याने ट्विटरवर चाहत्यांचे आभार मानले.

‘तुम्ही सातत्याने करत असलेल्या प्रार्थनांसाठी तुमचे खूप खूप आभार. मी तुमचा कायम ऋणी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आला असून त्यांचा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत आहे. ते आता घरी राहतील. मी आणि बाबा अजूनही रुग्णालयातच राहणार आहोत’, असं ट्विट अभिषेकने केलं.

ऐश्वर्या व आराध्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. अमिताभ बच्चन व अभिषेक यांच्यावर नानावटीमध्ये अजूनही उपचार सुरू आहेत. बिग बी व अभिषेक यांना ११ जुलै रोजी करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १२ जुलै रोजी ऐश्वर्या व आराध्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा या दोघींनी घरातच क्वारंटाइन करण्यात आलं होतं.  मात्र एका आठवड्यानंतर दोघींनाही नानावटीमध्ये दाखल करण्यात आलं.

दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेरचा कंटेन्मेट झोनचा बोर्ड मुंबई महापालिकेने उतरवला आहे. ११ जुलै रोजी हा बंगला सील करण्यात आला होता. आता या बंगल्यावरची कंटेन्मेंट झोनची पाटी उतरवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 4:21 pm

Web Title: aishwarya rai bachchan daughter aaradhya return home after coronavirus treatment ssv 92
Next Stories
1 जवळ कोणीच नसतं, हात थरथरतात; बिग बींनी सांगितलं रुग्णालयातील भयाण वास्तव
2 पडत्या काळात गोविंदाकडे इंडस्ट्रीने दुर्लक्ष केलं- शत्रुघ्न सिन्हा
3 वडिलांच्या आठवणीने भावूक झाले अमिताभ; ट्विट करुन म्हणाले…
Just Now!
X