News Flash

Video: ऐश्वर्या रायच्या स्टेज परफॉर्मन्सचा जुना व्हिडीओ व्हायरल

सध्या तिचा हा जुना व्हिडीओ चर्चेत आहे..

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चन ओळखली जाते. आजही ती लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते. अनेक तरुणी ऐश्वर्याला फॉलो करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या ऐश्वर्या स्टेजवर डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ २००५मध्ये आयोजित केलेल्या आयफा अवॉर्ड शोमधील आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास ३६ हजार लोकांनी पाहिला आहे.

ऐश्वर्याने ‘फन्ने खान’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटात राजकुमार राव आणि अनिल कपूर हे देखील मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. आता लवकरच ऐश्वर्या मणिरत्नम यांच्या चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ती अनुराग कश्यपच्या ‘गुलाब जामुन’ या चित्रपटातही भूमिका साकारु शकते अशा चर्चा रंगल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 7:18 pm

Web Title: aishwarya rai bachchan old dance video viral avb 95
Next Stories
1 सात तासांच्या चौकशीनंतर अभिनेता अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयाबाहेर
2 ‘सदोष टेस्ट किटमुळे करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती’- चिरंजिवींचा खुलासा
3 ‘जब तक है जान…’, रहमान यांनी सांगितल्या आठवण
Just Now!
X