22 October 2020

News Flash

Video : ‘मेरी सांसों में बसा हैं’ म्हणत ऐश्वर्याने दिला जुन्या आठवणींना उजाळा

पाहा, ऐश्वर्याच्या आवाजातील और प्यार हो गया चित्रपटातील गाणं

आपल्या आरस्पानी सौंदर्यामुळे आणि उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय -बच्चन. आजवरच्या कारकिर्दीत ऐश्वर्याने असंख्य चित्रपटांमध्ये काम केलं. यातील अनेक चित्रपट, त्यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे और प्यार हो गया. या चित्रपटातील गाणी त्या काळी तुफान गाजली असून त्यातलं एक लोकप्रिय गाणं ऐश्वर्या रायने गायलं असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेता बॉबी देओल आणि ऐश्वर्या यांची मुख्य भूमिका असलेल्या और प्यार हो गया या चित्रपटातलं मेरी सांसों में बसा हैं हे गाणं आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. या गाण्यात बॉबी आणि ऐश्वर्या झळकले होते. हेच गाणं ऐश्वर्याने एका कार्यक्रमात गायलं असून त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

“She is a Very good singer and not many people know it” Miss World 1994 Aishwarya Rai is indeed very talented

A post shared by Pageant and Glamour | India (@pageantandglamour) on

ऐश्वर्याचा हा व्हिडीओ एका सोशल साईटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये गाणं म्हणताना ऐश्वर्या प्रचंड लाजत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, तिचा हा व्हिडीओ पाहून ऐश्वर्या केवळ उत्तम अभिनेत्रीच नाही तर, एक चांगली गायिकादेखील असल्याचं पाहायला मिळतं.

दरम्यान, या व्हिडीओला आतापर्यंत ३२ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले असून त्यावर कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव होताना दिसत आहे.ऐश्वर्याने आजवरच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच ती गुलाब जामुन या चित्रपटात झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 1:32 pm

Web Title: aishwarya rai bachchan singing meri saanso mein basa hai song throwback video viral on internet dcp 98 ssj 93
Next Stories
1 अरे हे काय? दीपिका पदुकोणचा फोटो ‘मनरेगा’च्या ओळखपत्रावर
2 कंगनाचा ठाकरेंना टोला; म्हणाली, “महाराष्ट्रातील पप्पू सेना…”
3 ‘जर भविष्यात काही झाले तर..’, आदित्यच्या लग्नावर उदित नारायण यांची प्रतिक्रिया
Just Now!
X