News Flash

ट्रोलर्सना अजयने दिली खुमासदार शैलीत उत्तरं

त्याने मोबाईल नंबरचे ट्विट केले तेव्हा त्याच्यावर सर्व स्तरातून टीका झाली.

आपल्या आवडत्या कलाकाराशी, सेलिब्रिटीशी भेटण्याची, बोलण्याची, एक झलक पाहण्याची इच्छा प्रत्येक चाहत्याला असते. सोशल मीडियामुळे हे सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात सहजपणे राहतात. पण अचानक जर एखाद्या सेलिब्रिटीचा मोबाईल नंबरच तुम्हाला मिळाला तर? अभिनेता अजय देवगण याने त्याची पत्नी अभिनेत्री काजोल हिचा चक्क मोबाईल नंबर ट्विटरवर शेअर केला होता.

त्याने मोबाईल नंबरचे ट्विट केले तेव्हा त्याच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. पण त्यानंतर काही वेळाने त्याने ही निव्वळ एक मस्करी असल्याचे ट्विट केले आणि साऱ्यांना हसू आवरले नाही.

पण महत्वाचे म्हणजे आपण टाकलेल्या नंबरवरून ट्विटरवर काय काय कमेंट आल्या. काय प्रकारचे ट्विट करण्यात आले याकडे त्याने लक्ष ठेवलेच होते. इतकेच नाही, तर त्यापैकी काही ट्विट हे त्याने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून रिट्वीटही केले असून त्यावर खुमासदार शैलीत उत्तरं दिली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2018 5:23 am

Web Title: ajay devgan answers back trollers in lighter way
टॅग : Kajol
Next Stories
1 जस्लीन अनूप जलोटा यांच्यापासून गर्भवती होती का ?
2 ‘राधा प्रेम रंगी रंगली’ फेम अर्चना निपाणकरने लावला मुंबईच्या स्वच्छतेत हातभार
3 या कारणामुळे सनी लिओनीने नाकारली ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील भूमिका
Just Now!
X