राधिका आपटेने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले पाय भक्कम रोवले आहेत. याचे खरे श्रेय आहे ते तिने निवडलेल्या वेगवेगळ्या भूमिकांचे. आतापर्यंत केलेल्या नवनवीन प्रयोगांमुळेच तिच्यातला अभिनय प्रेक्षकांना अधिक भावला. प्रत्येक व्यक्तिरेखा खरी आणि जीवंत वाटण्यासाठी ती सर्वोतोपरी प्रयत्न करत असते. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीचा ‘पार्श’ हा नवीन सिनेमा येत आहे. नुकताच ‘पार्श’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. २३ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
लीना यादवने या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून, अजय देवगणने या सिनेमाची निर्मिती केली आहे. अजयने या सिनेमाचा ट्रेलर ट्विटरवर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करताना त्याने आकर्षक मेसेजही लिहिला आहे. ‘स्वतःला थोडं मोकळं करा आणि हा ‘पार्श’चा ट्रेलर बघा…’
या सिनेमात राधिका आपटेसोबत, सुरवीन चावला आणि तनिष्ठा चॅटर्जी यांच्याही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा सिनेमा दाखवण्यात आला आणि सगळ्याच ठिकाणी या सिनेमाची प्रशंसा करण्यात आली. राजस्थानच्या पाश्वभूमीवर बनलेल्या या सिनेमात तीन महिलांची कथा सांगण्यात आली आहे. या तीनही महिला गुजरातच्या एका गावात राहणाऱ्या असतात. गुलामगिरीच्या जगण्याला आव्हान देत या तीनही महिला परंपरागत रुढींना छेद देतात.
राधिका आपटेने या सिनेमात दिलेला न्यूड सीन लीक झाला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा सिनेमा वादात अडकलेला होता. शिवाय कोलकत्यामध्ये या सिनला पॉर्न फिल्म म्हणूनही बाजारात विकले जात होते. मुळात या सिनेमाचा विषय बोल्ड असल्यामुळे सिनेमाशी निगडीत व्यक्तीही याबाबद बोलायला टाळाटाळ करत आहेत. ‘पार्श’मध्ये राधिका आपटेने खऱ्या प्रेमाच्या शोधात असणाऱ्या एका महिलेची व्यक्तिरेखा साकारली आहे.
Let's break free! Watch #ParchedTrailer https://t.co/Cc4iYOZVXF. Movie releasing 23rd Sept.
— Ajay Devgn (@ajaydevgn) September 12, 2016