|| मानसी जोशी

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ या चित्रपटातून पदार्पण के लेला आणि घराघरात परिचयाचा झालेला अभिनेता आकाश ठोसर हा ‘डिस्ने हॉटस्टार’वरील ‘१९६२ -द वॉर इन द हिल्स’ या वेब मालिकेत महत्वाची भूमिका साकारतो आहे. सत्य घटनांवर आधारित या वेबमालिके चे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी के ले असून याआधीही आकाशने त्यांच्याबरोबर एक मराठी चित्रपट के ला आहे. ‘एफयू – फ्रे ण्ड्स अनलिमिटेड’ हा चित्रपट आणि ‘लस्ट स्टोरीज’ या वेबमालिके तील भूमिके नंतर तीन वर्षांनी आकाश या वेबमालिके तून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

‘१९६२ -द वॉर इन द हिल्स’ या वेबमालिके त १२५ भारतीय सैनिकांनी तीन हजार चिनी सैनिकांविरोधात केलेल्या लढाईची सत्यकथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. या वेबमालिके त आकाशबरोबर अभिनेता सुमीत व्यास आणि अभय देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘माझ्या भूमिकेचे नाव किशन यादव असे असून तो उत्तर प्रदेशातील छोटय़ा गावातून सैन्यात भरती झालेला असतो. ही भूमिका लिहिल्यावर त्यांसाठी तुझाच चेहरा डोळ्यासमोर उभा राहिला, त्यामुळे तूच ही भूमिका करणार आहेस, असे मांजरेकर यांनी सांगितले’, अशी आठवण आकाशने सांगितली. या भूमिकेसाठी आकाशने दहा किलो वजन वाढवले आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या आयुष्याभोवती गुंफण्यात आलेली ही कथा वास्तवातही आपल्या जिव्हाळ्याची आहे, असे तो सांगतो. ‘लहानपणापासून माझे भारतीय सैन्यात जाण्याचे स्वप्न होते. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी सैन्यात भरती होण्याकरता दोनदा परीक्षाही दिली होती. त्यानंतर मला ‘सैराट’मधील परश्याची भूमिका मिळाली. अर्थात, या भूमिके मुळे चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला, पण सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले’, असे तो सांगतो. या वेबमालिके मुळे ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवता आले नसले तरी त्याची काल्पनिक का होईना अनुभूती घेता आल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला.

महेश मांजरेकरांचे दिग्दर्शन आणि सुमीत तसेच अभय सारख्या हिंदी चित्रपटसृष्टीत मुरलेल्या कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभवही बरेच काही शिकवून गेल्याचे त्याने सांगितले. त्यांचा केवळ सेटवरील वावरच माझ्यासारख्या नवेदित कलाकाराला प्रेरणादायी ठरतो. महेश मांजरेकर हे  एक उत्कृष्ट दिग्दर्शक असून त्यांना प्रेक्षकांच्या आवडीची जाण आहे. अभिनेत्याकडून उत्कृष्ट अभिनय कसा करून घ्यायचा हे त्यांना सहज जमते. मी कोणत्याही दिग्दर्शकासोबत काम करताना माझे सवरेत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करतो, असे तो सांगतो. या क्षेत्रात अजूनही नवखा असल्याने आधी सेटवर जाण्यापूर्वी  मी संवाद घोकंपट्टी करून जात असे, मात्र सेटवर गेल्यावर मांजरेकर कधी संवादफे कीत तर कधी त्याच्या हाताळणीमध्ये महत्वपूर्ण बदल करायला सांगत असत. परिणामी मी अनेकदा पाठ केलेले संवाद विसरून जात असे. नंतर तर आम्ही संहिता वाचण्याचेही सोडून दिले, असे त्याने सांगितले. या वेबमालिके त फार मोठय़ा लांबीची भूमिका करता आली नाही, मात्र या निमित्ताने अभिनयाचे गिरवलेले धडे मोलाचे ठरले आहेत, असेही त्याने सांगितले.

एखाद्या चित्रपटाच्या कथेत घडावा, असाच त्याचा प्रवास आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक मुलाला नागराज मंजुळेसारखा दिग्दर्शक हेरतो. आणि त्याला घेऊन ‘सैराट’सारखा चित्रपट करतो. ‘सैराट’मुळे आपल्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यानंतर माझे जीवन पूर्णपणे बदलले. आधी पुणे – मुंबईतील रस्त्यांवर जाऊन फिरणं ही माझ्यासाठी सर्वसामान्य गोष्ट होती. आता मात्र लोक  ओळखत असल्याने समाजिक जीवनावर थोडय़ा मर्यादा आल्या आहेत, असे तो सांगतो. कलाकार कितीही प्रसिध्दीच्या शिखरावर पोहोचला तरी त्याला मेहनतीशिवाय पर्याय नाही, हा विचार मनाशी घट्ट बांधूनच आपण पुढची वाटचाल करणार असल्याचे आकाश सांगतो. लवकरच तो नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या हिंदी चित्रपटातही दिसणार आहे.