News Flash

अ.भा.मराठी चित्रपट महामंडळाचा वाद मिटला; मेघराज राजेभोसले यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड

अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद मिटला

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद आता मिटला आहे. पुन्हा एकदा मेघराज राजेभोसले यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे संचालक मंडळाने मेघराज राजेभोसले यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवत त्यांची निवड केली आहे.

२६ नोव्हेंबरला कोल्हापूर येथे झालेल्या महामंडळाच्या कार्यकारिणी बैठकीत अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. ज्यात तेरा संचालकांपैकी आठ संचालकांनी राजेभोसले यांच्या राजीनाम्याची मागणी करीत अविश्वास व्यक्त केला होता. त्यावेळी प्रभारी अध्यक्ष म्हणून विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची निवड करण्यात आली होती. त्यावेळी लवकरच पुढील बैठक घेऊन नवीन अध्यक्ष निवडले जातील, असे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांनी सांगितले होते.

बुधवार (९ डिसेंबर) रोजी मुंबई येथे संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सुशांत शेलार व निकिता मोघे यांनी मेघराज राजेभोसले यांना पाठिंबा दिल्यामुळे अविश्वास ठराव नामंजूर झाला आणि राजेभोसले यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

दरम्यान, यावेळी मेघराज राजेभोसले (अध्यक्ष), धनाजी यमकर (उपाध्यक्ष), मा. विजय खोचीकर (उपाध्यक्ष), सुशांत शेलार (प्रमुख कार्यवाह), चैत्राली डोंगरे (सह कार्यवाह), निकिता मोघे (सह कार्यवाह), संजय ठुबे (खजिनदार), शरद चव्हाण (सह खजिनदार), पितांबर काळे (संचालक), सतीश रणदिवे (संचालक), सतीश बिडकर (संचालक), वर्षा उसगांवकर (संचालिका), रणजित तथा बाळा जाधव (संचालक), रवींद्र गावडे (स्वीकृत संचालक), रत्नकांत जगताप (स्वीकृत संचालक) उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 4:08 pm

Web Title: akhil bhartiya marathi chitrapat mahamandal meghraj rajebhosle ssj 93
Next Stories
1 जेम्स बॉण्डच्या पहिल्या पिस्तुलाचा झाला लिलाव; किंमत ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
2 ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधील या’ चिमुकलीला ओळखलं का ? सौंदर्यामुळे करते आज अनेकांना घायाळ
3 अरारारा खतरनाकऽऽऽऽ… आता पुन्हा होणे नाही; भिडेंच्या निधनानंतर प्रवीण तरडेंची भावूक पोस्ट
Just Now!
X