09 March 2021

News Flash

रक्षाबंधनच्या मुहूर्तावर अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची घोषणा

अक्षयच्या करिअरमधील सर्वांत कमी वेळेत साइन केलेला 'हा' चित्रपट

रक्षाबंधनच्या मुहूर्तावर अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा पोस्टर अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘रक्षाबंधन’ हेच चित्रपटाचं नाव असून त्यावरून हा चित्रपट बहीण-भावाच्या नात्यावर आधारित असल्याचं स्पष्ट होतंय. या पोस्टरमध्ये अक्षयसोबत त्याच्या चार बहिणी पाहायला मिळत आहेत. त्याच्या हातावर राख्यासुद्धा बांधलेल्या आहेत.

‘बस बहनें देती है १००% रिटर्न’ अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. ‘तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी कथा आहे. माझ्या करिअरमध्ये मी आतापर्यंत सर्वांत कमी वेळात साइन केलेला हा चित्रपट आहे. हा चित्रपट मी माझी बहीण अल्का हिला आणि जगातलं सर्वांत खास बहीण-भावाच्या नात्याला समर्पित करतो’, असं कॅप्शन अक्षयने या पोस्टरला दिलं आहे.

या चित्रपटाची पटकथा हिमांशू शर्माने लिहिली असून आनंद एल राय याचं दिग्दर्शन करणार आहेत. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 12:02 pm

Web Title: akshay kumar announced his new movie raksha bandhan ssv 92
Next Stories
1 सुशांत सिंह प्रकरण : काळी जादू करण्यासाठी रियाने केला सुशांतच्या पैशांचा वापर?
2 सुशांत सिंह प्रकरण : रियाचं कुटुंबीयांसोबत मध्यरात्री गुपचूप पलायन?
3 “ते दोघे एकदाच भेटले तर…”; दोन्ही आत्महत्येंचा संबंध असल्याचे म्हणणाऱ्यांना दिशाच्या आईचा सवाल
Just Now!
X