News Flash

अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’मधील हटके लूक पाहिलात का?

या लूकमध्ये अक्षय कुमार अत्यंत हटके अंदाजात दिसत आहे.

बॉलिवूडमधील खिलाडी अभिनेता अक्षय कुमार लवकरच अॅक्शनचा भरणा असलेला एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘बच्चन पांडे’ असे आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या लूकमध्ये अक्षय कुमार अत्यंत हटके अंदाजात दिसत आहे.

अक्षय कुमारने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षय कुमारने कपाळाला टिळा लावला असून गळ्यात वेगवेगळ्या चैनी घातल्या आहेत. दरम्यान अक्षयने लूंगी परिधान केली आहे. त्याचा हा हटके लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता चाहत्यांची चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘बच्चन पांडे’ हा चित्रपट फरहाद सामजी दिग्दर्शित करणार असून साजिद नाडियाडवाला चित्रपटाची निर्मिती करणार आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकसह चित्रपट डिसेंबर २०२०मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे. सध्या अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट ‘मिशन मंगल’मध्ये व्यग्र आहे. त्याचा हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर अक्षय रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अक्षयसह कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार असून चित्रपट २७ मार्च २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 1:38 pm

Web Title: akshay kumar bachan pandey movie first look avb 95
Next Stories
1 रोहित शर्माने अनफॉलो केल्यानंतर अनुष्काने लिहिली ‘ही’ पोस्ट
2 पूरग्रस्तांना बिग बींकडून ५१ लाखांची मदत!
3 भारताचा व्हिसा मिळवण्यासाठी या अभिनेत्रीला २० लाखाचा गंडा
Just Now!
X