News Flash

‘अतरंगी रे’च्या दोन आठवड्यांच्या शुटिंगसाठी अक्षय कुमारने घेतले इतके मानधन

जाणून घ्या त्या विषयी...

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने अनलॉकची प्रक्रिया सुरु होताच आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणास सुरुवात केली. अक्षयचे ‘बेल बॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या अक्षय अतरंगी रेचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटाच्या दोन आवड्यांच्या चित्रीकरणासाठी त्याने तगडे मानधन घेतले आहे.

‘अतरंगी रे’ या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आनंद एल रॉय दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी तो सध्या शुटींग करत आहे. या दोन आठवड्याच्या चित्रीकरणासाठी अक्षय कुमारने जवळपास २७ कोटी रुपये मानधन घेतले असल्याचे म्हटले जाते.

अतरंगी रे चित्रपटासाठी निर्मात्यांनी अक्षय पूर्वी हृतिक रोशनची निवड केली होती. पण काही कारणास्तव हृतिकने या भूमिकेसाठी नकार दिला. त्यानंतर आनंद एल रॉय यांनी अक्षय कुमारची निवड केली आणि त्याने देखील होकार दिला. हा चित्रपट एक लव्ह स्टोरी आहे असे म्हटले जाते. लॉकडाउनपूर्वी ५ मार्च रोजी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले होते. चित्रपटाच्या सेटवर पूजा देखील करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 4:38 pm

Web Title: akshay kumar charged 27 crore for film atrangi re shoot for 2 weeks avb 95
Next Stories
1 Video : ‘एक,दो, तीन’! वर्कआऊटचा कंटाळा आल्यानं इशानं बघा काय केलं?
2 निक्की तांबोळीमुळे साराच्या डोळ्याला दुखापत; ‘बिग बॉस’मध्ये एडिट केला सीन
3 ‘२ मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी काहीही’; सलमान-अक्षयवर आरोप करणारा केआरके होतोय ट्रोल
Just Now!
X