03 March 2021

News Flash

अक्षय कुमार मदतीसाठी पुन्हा सज्ज; ‘या’ क्षेत्रातील मजुरांना केली आर्थिक मदत

यापूर्वी अक्षयने पंतप्रधान मदतनिधीमध्ये २५ कोटी रुपये दिले आहेत

अक्षय कुमार

देशावर ओढावलेल्या करोना विषाणूच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक प्रयत्न करत आहे. सध्या देशात चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरु आहे. या काळात हातावर पोट असणाऱ्यांवर अनेक मोठी संकट कोसळली आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले आहेत. या सेलिब्रिटींचाही समावेश आहे. आतापर्यंत अभिनेता अक्षय कुमारने गरजुंना आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना विविध मार्गाने मदत केली आहे. त्यातच त्याने आणखी एक मदत केल्याचं समोर आलं आहे.

अक्षयने अलिकडेच सिंटा’ म्हणजेच ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ला ४५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली असून ही रक्कम कलाविश्वात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. सिंटाचे सहसचिव अमित बहल यांनी काही दिवसापूर्वी ‘मिड डे ‘ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलत असताना त्यांनी अक्षयने केलेल्या मदतीची माहिती दिली, तसंच त्याचे आभारही मानले.

“या कठीण प्रसंगामध्ये अक्षयने मदतीचा हात पुढे केल्यामुळे आम्ही सगळे त्याचे खरंच आभारी आहोत. अक्षयला माहिती मिळाल्यानंतर त्याने क्षणाचाही विलंब न लावता मदतीचा हात पुढे केला.  अक्षयने ४५ लाख रुपयांची मदत केली असून ही मदत जवळपास १५०० मजुरांपर्यंत पोहोचली असून या मजुरांनी फोन, मेसेजच्या माध्यमातून मदत मिळाल्याचं सांगत आभार मानले आहेत. विशेष म्हणजे अक्षय कुमारप्रमाणेच अन्य काही कलाकारांनीही मदत केली आहे. यात साजिद नाडियादवाला यांनी प्रत्येक मजुराच्या खात्यात ३ हजार रुपये जमा केले आहेत”, असं अमित बहल यांनी सांगितलं.

दरम्यान, यापूर्वी अक्षयने विविध मार्गाने गरजुंची मदत केली आहे. त्याने पंतप्रधान मदतनिधीमध्ये २५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तसंच २ कोटी रुपये मुंबई पोलीस फाउंडेशनसाठी,३ कोटी बीएमसीसाठी दिले आहेत. सध्या लॉकडाउन असल्यामुळे अक्षयच्या अनेक चित्रपटांचं चित्रीकरण रखडलं आहे. तो लवकरच ‘सूर्यवंशी’, ‘बेल बॉटम’, ‘बच्चन पांडे’, ‘पृथ्वीराज’,’अतरंगी रे’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. तसंच त्याचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2020 8:56 am

Web Title: akshay kumar donates 45 lakh for daily wagers in cintaa ssj 93
टॅग : Coronavirus
Next Stories
1 VIDEO : नाचणाऱ्या साराला भिकारी समजून लोकांनी दिले होते पैसे
2 पूजा हेगडेचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; रात्री एक वाजता केला असा मॅसेज
3 Video : प्रशांत दामलेंसोबत रंगली गप्पांची संध्याकाळ
Just Now!
X