‘फोर्ब्स’ मासिकाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील कलाकारांची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीमध्ये खिलाडी अर्थात अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूडमधील सर्वाधित कमाई करणारा अभिनेता ठरला आहे. अक्षयने गेल्या वर्षभरामध्ये ६५ मिलियन डॉलर म्हणजे सुमारे ४४४ कोटी रुपये इतकी कमाई केली आहे. त्याच्या या यशानंतर अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यातच अभिनेत्री तापसी पन्नूने मात्र हटके कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या.
‘फोर्ब्स’च्या यादीनुसार, अक्षय कुमारने जून २०१८ ते जून २०१९ या कालावधीमध्ये तब्बल ४४४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर तापसीने एक मजेशीर ट्विट केलं आहे. विशेष म्हणजे अक्षयने सुद्धा एक हटके फोटो शेअर करत तिच्या ट्विटला उत्तर दिलं आहे.
Inspiring , deserving and truly one of the best we have around. @akshaykumar
Bas sir ab sharing and caring ki baari hai https://t.co/vNamRcUiMl
— taapsee pannu (@taapsee) July 12, 2019
तापसीने तिच्या ट्विट अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत ‘सर, अब शेअररिंग अॅण्ड केअरिंग की बारी है’, असं म्हटलं आहे.
तिच्या या पोस्टनंतर अक्षयने सुद्धा मजेशीर फोटो शेअर केला आहे. अक्षयने एक विचित्र हावभाव असलेला चेहरा शेअर करत ‘माफ किजिए’? असं म्हटलं आहे.
Inspiring , deserving and truly one of the best we have around. @akshaykumar
Bas sir ab sharing and caring ki baari haihttps://t.co/vNamRcUiMl
— taapsee pannu (@taapsee) July 12, 2019
दरम्यान, फोर्ब्सने शेअर केलेल्या यादीमध्ये अक्षयने रिहाना, जॅकी चैन, ब्रॅडली कूपर, स्कारलेट जॉनसन यांसारख्या कलाकारांनाही मागे टाकलं आहे. अक्षय कुमारच्या हाती सध्या ‘हाऊसफुल ४’, ‘मिशन मंगल’, ‘सूर्यवंशी’, ‘गुड न्यूज’, ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे बरेच चित्रपट आहेत.