News Flash

‘रसोडे मे कौन था?’; अक्षय कुमारने दिलं मजेशीर उत्तर

इन्स्टाग्रामवर केला फोटो पोस्ट

‘रसोडे मे कौन था’ हा प्रश्न आता घरोघरी पोहोचला आहे. ‘साथ निभाना साथिया’ या लोकप्रिय मालिकेतील कोकिलाबेन या व्यक्तीरेखेच्या संवादावरून अनोखा रॅप साँग तयार करणारा यशराज मुखाटे रातोरात प्रसिद्ध झाला. या रॅप साँगमध्ये कोकिलाबेन तिच्या सुनेला प्रश्न विचारते की, रसोडे मे कौन था? या प्रश्नाचं मजेशीर उत्तर बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारने दिलं आहे.

अक्षय़ने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अक्षयसोबत ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या प्रसिद्ध शोचा सूत्रसंचालक बेअर ग्रिल्स पाहायला मिळत आहे. जंगलात बेअर अक्षयसोबत खाण्याची काहीतरी व्यवस्था करत असताना हा फोटो काढण्यात आला आहे. हा फोटो पोस्ट करत अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘रसोडे मे बेअर था…काय शिजतंय याचा अंदाज लावू शकता का?’

डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘Into The Wild’ हा शो अतिशय लोकप्रिय आहे. बेअर ग्रिल्स सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत देखील झळकले होते. आता अभिनेता अक्षय कुमार देखील शोमध्ये हजेरी लावणार आहे. ‘Into The Wild’ या शोमध्ये सहभागी होणारा अक्षय कुमार तिसरा भारतीय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 5:26 pm

Web Title: akshay kumar has a unique answer to rasode mein kaun tha question ssv 92
Next Stories
1 कंगना रणौत संतापली; टीका करणाऱ्या अभिनेत्रीला ट्विटरवर केलं ब्लॉक
2 खोटं बोलणं थांबवा म्हणत शिल्पा शिंदेने शेअर केले स्क्रीनशॉट
3 “मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण…”; राष्ट्रवादीचा कंगनाला टोला
Just Now!
X