25 February 2021

News Flash

बच्चन पांडेसाठी अक्षय कुमारचा राऊडी लूक; फोटो पाहून व्हाल चकित

यापूर्वी कधीही पाहिला नसेल अक्षयचा असा लूक

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हे नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर त्याचे सगळे अॅक्शन सीन उभे राहतात. अभिनयासोबतच अक्षयच्या अॅक्शन सीनची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे त्याचा असाच एक अॅक्शनपॅक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बच्चन पांडे असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटातील त्याचा राऊडी लूक प्रदर्शित झाला आहे.

अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्रामवर बच्चन पांडेमधील त्याच्या नव्या लूकमधील फोटो शेअर केला आहे. या लूकमध्ये अक्षय पूर्णपणे नव्या अंदाजात दिसत असून त्याचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)


शेअर केलेल्या फोटोमध्ये अक्षयने काळ्या रंगाचा कुर्ता आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तसंच डोक्यावर लाल रंगाचा पंचा गुंडाळला आहे. “नव्या वर्षात बच्चन पांडे चित्रपटाचं चित्रीकरण सुरु. साजिद नाडियादवालासोबत माझा हा १० वा चित्रपट आहे. यापुढेदेखील त्याच्या चित्रपटात काम करत राहीन. मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. मी कसा दिसतोय हे सांगा”, असं कॅप्शन अक्षयने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, बच्चन पांडे या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार असून अभिनेत्री क्रिती सेनॉन त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तसंच अर्शद वारसी, जॅकलीन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी ही कलाकारमंडळीदेखील महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 2:23 pm

Web Title: akshay kumar has started shooting for his upcoming bachchan pandey film ssj 93
Next Stories
1 सैफने रावणाविषयी केलेल्या वक्तव्यावर ‘आदिपुरुष’च्या संवाद लेखकाने मांडले मत
2 डाव मांडते भीती…. अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं
3 कल्कीच्या चिमुकलीनेही केला नववर्षाचा संकल्प
Just Now!
X