News Flash

अक्षयकुमारनं मानधन वाढवल्याची चर्चा; आकडा ऐकून बसेल धक्का!

हे मानधन त्याने आगमी चित्रपटासाठी वाढवले असल्याचे म्हटले जाते

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार वर्षभरात किमान चार-पाच वेळा तरी रुपेरी पडद्यावर पहायला मिळतो. २०१९ मध्ये अक्षय कुमारचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यामध्ये ‘केसरी’, ‘मिशन मंगल’ आणि ‘हाऊसफूल ४’ या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली. याव्यतिरिक्त करण जौहरच्या ‘गुड न्यूज’ या चित्रपटात देखील अक्षय कुमार दिसणार आहे. हा चित्रपट येत्या २७ डिसेंबर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच पुढच्या वर्षी अक्षय कुमारचे ‘सूर्यवंशी’, ‘बच्चन पांडे’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता अक्षयने आणखी एक चित्रपट साईन केला असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटासाठी अक्षयने त्याच्या मानधनात वाढ केली असल्याचे देखील म्हटले जात आहे. ‘बॉलिवूड हंगाम’ने दिलेल्या रिपोर्टनुसार अक्षय कुमार वासु भगनानी आणि ‘एअरलिफ्ट’ चित्रपटाचा दिग्दर्शक निखिल आडवाणीसोबत एक पॉवर पॅक चित्रपट करणार असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटात अॅक्शन, इमोशन आणि मनोरंजनाचा मारा करण्यात येणार आहे. तसेच हा चित्रपट वास्तविक घटनेवर आधारित असल्याच्या देखील चर्चा आहेत.

अक्षयचा आगामी चित्रपट बिग बजेट फिल्म असणार असून त्याचे चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात येणार आहे. अक्षयने चित्रपटासाठी होकार दिला असला तरी तिने १०० कोटी रुपये मानधन मागितले असल्याचे म्हटले जात आहे. अक्षयने मागितलेल्या एकूण मानधनावरुन तो बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरणार आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या शोधात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 10:57 am

Web Title: akshay kumar increase his movie rates avb 95
Next Stories
1 आमिरमुळे जुहीने गमावला ‘राजा हिंदुस्थानी’
2 ‘शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या KBCवर बहिष्कार टाका’; #Boycott_KBC_SonyTv देशभरात ट्रेडिंग
3 Video : …म्हणून ‘त्या’ गरजू लहान मुलीसोबत फोटो काढण्यास जान्हवीने दिला नकार
Just Now!
X