उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत येताच त्यांनी उत्तर प्रदेशमधील फिल्म सिटीची अधिकृत घोषणा केली. “उत्तर प्रदेशात १ हजार हेक्टरपेक्षा जास्त जागेवर जागतिक स्तरावरील फिल्म सिटी उभी करण्यात येईल,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले. या मोठ्या प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी त्यांनी अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली.

हा प्रकल्प कसा उभारावा? फिल्म सिटी उभारण्यासाठी कुठल्या गोष्टींची गरज असते? मुंबई फिल्म सिटीचं वैशिष्ट्य काय आहे? यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी अक्षयसोबत चर्चा केली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले,” उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचं काम आम्ही करत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधिकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहिलं. आशियातील सर्वात मोठं विमानतळ असलेल्या जेवर विमानतळाजवळील १ हजार हेक्टरपेक्षा अधिक जागेवर ही फिल्म सिटी उभी करणार आहोत. या ठिकाणाहून उत्तर प्रदेशसह आणि देशातील इतर भागांशी जोडणारी दळणवळणांची सर्व साधनं असतील. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही यासाठी रस दाखवला आहे. त्यासाठी त्यांचं अभिनंदन,” अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.