News Flash

‘एअरलिफ्ट’ चित्रपटात अक्षय आणि निमरतची जोडी

बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून प्रसिध्द असलेला अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.

| February 24, 2015 12:47 pm

बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून प्रसिध्द असलेला अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘एअरलिफ्ट’ या आगामी चित्रपटात अक्षय कुमार आणि निमरत कौर ही जोडी दिसणार आहे. अक्षय आणि चित्रपटातील अन्य कलाकार असलेले चित्रपटाचे पहिले पोस्टर अलिकडेच प्रसिध्द करण्यात आले. कुवेतमधील एका व्यापाऱ्याची भूमिका साकारत असलेल्या अक्षयचा हा चित्रपट १९९० सालच्या आखाती युध्दावर आधारित असल्याचे बोलले जाते. या युध्दादरम्यान भारतीयांना कशाप्रकारच्या परिस्थितीतून कुवेतमधून बाहेर पडावे लागले आणि कोणत्या हालअपेष्टांचा सामना करावा लागला यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2015 12:47 pm

Web Title: akshay kumar nimrat kaur will be together in airlift movie
Next Stories
1 मिक्ता २०१५: सलीम खान यांना ‘गर्व महाराष्ट्राचा’ पुरस्कार
2 करण जोहरच्या चित्रपटात दिसणार आलिया भट आणि सिध्दार्थ मल्होत्रा
3 आक्षेपार्ह शब्दांची यादी सेन्सॉर बोर्डाने रोखून धरली
Just Now!
X