28 September 2020

News Flash

जबरदस्त… ‘सुर्यवंशी’ अक्षयसोबत सिंघम, सिम्बाही झळकणार

बहुचर्चित ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी, ड्रामा या सर्व गोष्टी एकाच चित्रपटात म्हटलं की दिग्दर्शक रोहित शेट्टी आठवल्याशिवाय राहत नाही. ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘सिंघम’, ‘गोलमाल’, ‘सिम्बा’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफीस गाजवलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा रोहित शेट्टीचा बहुचर्चित ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि रणवीर सिंहदेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

अभिनेता अक्षय कुमारने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे. शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये अभिनेता रणवीर सिंह, अजय देवगण, अक्षय कुमार, रोहित शेट्टी आणि करण जोहर झळकत आहेत. विशेष म्हणजे रणवीर आणि अजयदेखील सूर्यवंशीचा एक भाग होणार असल्याचा सूचक संदेश या फोटोमधून देण्यात आला आहे.


दरम्यान, रोहित शेट्टी त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या शेवटी आगामी प्रोजेक्टची माहिती देत असतो. ‘सिम्बा’च्या क्लायमॅक्समध्येही त्याने त्याच्या ‘सूर्यवंशी’ची घोषणा केली होती. या क्लायमॅक्समध्येही सिंघमची भूमिका वठविणारा अजय फोनवर अक्षयशी संवाद साधतांना दाखविण्यात आला होता. त्यामुळे रोहितच्या आगामी ‘सूर्यवंशी’मध्ये अजय, अक्षय आणि रणवीर या तिघांची जोडी जमणार असा अंदाज लावण्यात येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2019 12:20 pm

Web Title: akshay kumar ranveer singh ajay devgn with rohit shetty in sooryavanshi movie
Next Stories
1 हार्दिकला ‘भाऊ’ म्हटल्यामुळे क्रिस्टल डिसुजा झाली ट्रोल
2 सिद्धार्थच्या लग्नाबाबत प्रियांकाची आई म्हणते…
3 अजयच्या वेडापायी लागले गुटख्याचे व्यसन, झाला कॅन्सर अन् आता म्हणतो…
Just Now!
X