News Flash

‘टॉयलेट- एक प्रेम कथा’साठी अक्षय- रणवीरने केला ‘चीप डान्स’

दोघंही 'वक्त हमारा है' गाण्यावर नाचायला लागतात

काही तासांपूर्वी ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट’ एक प्रेम कथा’ सिनेमाचे कलेक्शन चाहत्यांसोबत शेअर केले होते. या सिनेमाने विकेण्डमध्ये ५० कोटींपेक्षाही जास्तीची कमाई केली आहे. सिनेमाच्या या कमाईमुळे खिलाडी कुमार सध्या भलताच खूश आहे. सध्या तो सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असताना रणवीर सिंगशिवाय त्याला कोण चांगली कंपनी देईल? रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला.

एकता कपूरमुळे पहलाज निहलानी यांना सोडावं लागलं अध्यक्षपद?

या व्हिडिओमध्ये तो आणि अक्षय कुमार अगदी गणपती डान्स करतायेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. अक्षयचे अभिनंदन करण्यासाठी त्याने हा व्हिडिओ शूट केला होता. पण या व्हिडिओमध्येही त्याने तेवढीच पागलपंती केली होती. हा व्हिडिओ पाहताना तुम्ही हसणार नाही असे होणे अशक्यच. अक्षयच्या ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ या सिनेमाप्रमाणेच हा व्हिडिओही फूल पैसा वसूल आहे. व्हिडिओच्या सुरूवातीला रणवीर व्हॅनिटी व्हॅनमध्ये बाथरूमला जाण्यासाठी म्हणून धावत येतो. टॉयलेटचं दार उघडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आतून अक्षय कुमार बाहेर येतो. तेव्हा या दोघांमध्ये छोटेसे संभाषणही होते

रणवीर सिंग- सर, तुम्ही आत? काय झालं?

अक्षय कुमार- टॉयलेटची ओपनिंग झाली

रणवीर सिंग- टॉयलेटची ओपनिंग झाली?

त्यांच्या या संभाषणानंतर दोघंही ‘वक्त हमारा है’ गाण्यावर नाचायला लागतात. त्यांचा हा डान्स पाहून गणेशोत्सवात नाचणाऱ्या लोकांची आठवण झाल्यावाचून राहत नाही. आम्हाला हा व्हिडिओ पाहून हसू आले तुमचं काय?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 5:07 pm

Web Title: akshay kumar ranveer singh celebrate toilet ek prem katha success with a cheap dance leaving us in splits watch video
Next Stories
1 ‘बोस डेड ऑर अलाइव्ह’
2 चिमुकल्या चाहतीसोबतचा ऐश्वर्याचा हा व्हिडिओ पाहिलात का?
3 नवोदित गायकांसाठी ९१.१ एफएमची ‘रेडिओ सिटी सुपर सिंगर’ स्पर्धा
Just Now!
X