News Flash

अक्षय कुमारच्या मुलीसोबत दिसले हे स्टार किड्स

स्टार किड्सबद्दल नेहमीच कुतुहलाचं वातावरण पाहायला मिळालं आहे

बॉलिवूडमध्ये स्टार किड्सबद्दल नेहमीच कुतुहलाचं वातावरण पाहायला मिळालं आहे. जेव्हाही स्टार किड्सचे फोटो काढले जातात ते अवघ्या काही मिनिटांत सोशल मीडियावर व्हायरल होतात. यावेळी अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी आणि हृतिक रोशन यांच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ही सगळी बच्चेकंपनी आपल्या पालकांसोबत जुहू येथील एका चित्रपटगृहात गेले होते. मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा म्हणून स्टार्सनी सिनेमाचाच आधार घेतला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. चला तर मग या स्टार कीड्सचे काही व्हायरल झालेले फोटो पाहू.
नितारा बाबा अक्षय कुमार आणि आई ट्विंकल खन्नासोबत मजा करताना दिसते. आतापर्यंत अक्षय आणि ट्विंकलने निताराला प्रसारमाध्यमांसमोर आणले नव्हते. सुरूवातीला अक्षयचा मोठा मुलगा आरवही प्रसारमाध्यमांपासून लांबच पळायचा.

शिल्पा शेट्टी आणि तिचा मुलगा वियानही सिनेमा पाहायला आले होते. वियानने निताराएवढीच मजा केली असेल यात काही शंका नाही. यावेळी वियानने स्पायडरमॅनचे टी- शर्टी घातले होते.

स्टारकिड्सच्या यादीत हृतिक रोशनच्या रिदान आणि रिहान या दोन्ही मुलांची नावं अग्रणी येतात. हृतिकला जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा तो पूर्ण वेळ आपल्या मुलांनाच देणे पसंत करतो. हृतिकची दोन्ही मुलं आता कॅमेऱ्यांना चांगलीच सरावली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 5:52 pm

Web Title: akshay kumar shilpa shetty and hrithik roshan spotted with there kids
Next Stories
1 बॉबी देओलने जिंकली नव्या लूकची ‘रेस’
2 प्रभासचा ‘साहो’ या कारणासाठी असेल खास
3 महिलांसाठी आपल्या समाजात मैत्रीपूर्ण वातावरण नाही; ‘पद्मावती’ वादावर मिस वर्ल्ड मानुषीची प्रतिक्रिया
Just Now!
X