News Flash

या कारणासाठी अक्षय कुमारच्या मुलाला आवडत नाही क्रिकेट

अक्षय कुमार क्रिकेटचा चाहता आहे.

अक्षय कुमार, आरव

अक्षय कुमार नेहमीच सामाजिक माध्यमांवर विविध विषयांवरील आपली मतं मांडत असतो. कला, क्रिडा, राजकारण या विषयांवर तो मत व्यक्त करतो. सध्या विश्वचषकाची चर्चा सुरु असताना त्याने क्रिकेटच्या त्याच्या आवडीबद्दल सांगितलं.

अक्षय कुमार क्रिकेटचा चाहता आहे. पण, त्याचा मुलगा, आरवला मात्र क्रिकेट अजिबात आवडत नाही. यामागचं कारण स्वतः अक्षयने सांगितलं आहे. अक्षय म्हणाला की, “माझ्या मुलाला क्रिकेट आवडत नाही. पण, माझी मुलगी निताराला मात्र क्रिकेटचे खूप वेड आहे. ती फक्त ६ वर्षांची आहे. तिला क्रिकेट प्रचंड आवडतं. पण, माझ्या मुलाला मात्र क्रिकेटची आवड नाहीये कारण मी हा खेळ खूप बघतो. माझ्या मुलीला मात्र मी क्रिकेट बघतो हे आवडतं कारण, त्यानिमित्ताने तिलाही क्रिकेट बघता येतं.”

अक्षय असंही म्हणाला की, “मी शाळेत असताना क्रिकेट खेळायचो. मला नेहमी यष्टीरक्षणासाठी निवडलं जायचं.” इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यान विश्वचषकातील अंतिम सामना चांगलाच रंगला. हा मुकाबला पाहण्यासाठी लॉर्ड्सच्या मैदानावर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार गेला होता.

दरम्यान, अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या तयारीत आहे. हा चित्रपट २७ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 3:44 pm

Web Title: akshay kumar son cricket aarav fan dislike djj 97
Next Stories
1 ‘अर्जुन रेड्डी’ म्हणतोय ‘मी का बघू कबीर सिंग?’
2 ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग
3 विश्वचषक स्पर्धेतील अनुष्काच्या या लूकची जोरदार चर्चा
Just Now!
X