News Flash

छायाचित्रातील अक्षय कुमारसोबतच्या या मुलाला ओळखलंत का?

हे छायाचित्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Akshay Kumar Throwback photo : रणवीर सिंग नेहमीच त्याच्या हटके कृत्यांमुळे बॉलीवडूमध्ये आकर्षणाचा विषय ठरला आहे.

सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘रूस्तम’ या चित्रपटाच्यानिमित्ताने चांगलाच चर्चेत आहे.  आता अभिनेता रणवीर सिंग याने ट्विट केलेल्या एका छायाचित्रामुळे या चर्चेत आणखीनच भर पडली आहे. हे छायाचित्र रणवीर सिंगच्या बालपणीचे असून तो या छायाचित्रात ‘खिलाडी’फेम अक्षय कुमारसोबत दिसत आहे. या छायाचित्रातील लहान मुलगा रणवीर सिंग असल्याचे समजल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे छायाचित्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मी लहानपणी अक्षय कुमारचा मोठा चाहता असल्याचे रणवीर सिंगने ट्विटमधील संदेशात म्हटले आहे.
सलमान म्हणतो ‘रुस्तम’ बघाच
रणवीर सिंग नेहमीच त्याच्या हटके कृत्यांमुळे बॉलीवडूमध्ये आकर्षणाचा विषय ठरला आहे. रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये ‘सुलतान’ चित्रपट पाहिला होता. यावेळी सुलतानच्या ‘बेबी को बेस पसंद है’ आणि ‘लगे ४४०’ वोल्ट गाण्यांवर थिरकण्याचा मोह रणवीरला आवरता आला नाही. त्याने चित्रपटाचे स्क्रिनिंग सुरू असतानाच गाण्यांवर बेधुंद होऊन नाचण्यास सुरूवात केली. उपस्थितांनाही रणवीरच्या नृत्याला जोरदार प्रतिसाद दिला.
मला त्याला ठार मारावेसे वाटते; रणवीरच्या ‘त्या’ डान्सवर सलमानची प्रतिक्रिया

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 10:45 am

Web Title: akshay kumar throwback photo has another star in it can you guess who is it
Next Stories
1 दिलीप प्रभावळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
2 ‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’मध्ये मी नाही- जॉन अब्राहम
3 कांताबाई येतेय तुमच्या भेटीला!
Just Now!
X