13 July 2020

News Flash

पाहा: अक्षय कुमारच्या ‘बेबी’ चित्रपटाचा ट्रेलर

बॉलिवूडमध्ये रावडी राठोडची इमेज असणाऱ्या अक्षय कुमारच्या 'बेबी' या चित्रपटाचा ऑनलाईन ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

| December 4, 2014 12:25 pm

अभिनेता अक्षय कुमार.

बॉलिवूडमध्ये रावडी राठोडची इमेज असणाऱ्या अक्षय कुमारच्या ‘बेबी’ या चित्रपटाचा ऑनलाईन ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अॅक्शन-थ्रीलर प्रकारातील हा चित्रपट आपल्यासाठी अत्यंत खास असल्याचे अक्षयने यापूर्वीच सांगितले होते. गेले कित्येक दिवस ‘बेबी’ चा ट्रेलर प्रदर्शित होण्याची मी वाट पाहत होतो, अखेर ही प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. हा ट्रेलर बघून तुमच्या भावना माझ्यापर्यंत नक्की पोहचवा, असे आवाहन अक्कीने ट्विटरवरून केले आहे.
‘बेबी’ या चित्रपटाचा दिग्दर्शक नीरज पांडेबरोबर अक्षयने यापूर्वीही ‘स्पेशल २६’च्या वेळी काम केले आहे. अक्षयच्या क्रेझी फॅन्सनी सोशल मीडियावर या सिनेमाची जबरदस्त क्रेझ निर्माण केली आहे. या फॅन्सनी ट्विटरवर Waiting for BABY Trailer हा हॅशटॅग बनवला आहे. गेल्या पंधवरड्यात हा टॅग ट्रेंडिंगमध्ये होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2014 12:25 pm

Web Title: akshay kumars baby trailer released
Next Stories
1 ‘बदलापूर’ची पहिली पंधरा मिनिटे दवडू नका – दिग्दर्शक श्रीराम राघवन
2 सोहा अली खानचे कुणाल खेमूसोबत २५ जानेवारीला शुभमंगल
3 मनोज वाजपेयी साकारणार समलिंगी व्यक्तीरेखा!
Just Now!
X