News Flash

आलिया-रणबीर जोडीने निघाले फिरायला; फोटो होत आहेत व्हायरल

आलिया नुकतीच करोनातून बरी झाली आहे

फोटो सौजन्यःवरिंदर चावला

अभिनेत्री आलिया भटला काही दिवसांपूर्वीच करोनाची लागण झाली होती. नुकतीच तिची करोना चाचणी निगेटिव्ह आली असून ती आता बरी झाली आहे. तिचा विलगीकरणाचा कालावधीही आता पूर्ण झाला आहे. ती आता तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत फिरायला चालली आहे.

आज सकाळी ते दोघेही मुंबई विमानतळावर दिसले. हे दोघेही मालदिवला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दोघांनाही काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

गेल्या महिन्यात आलियाने आपला करोना अहवाल निगेटिव्ह आल्याची बातमी शेअर केली होती. त्यासोबत तिने एक फोटोही शेअऱ केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये ती म्हणत होती, “आत्ताचाच काळ आहे ज्यात निगेटिव्ह असणं चांगली गोष्ट आहे.” तिने आपला आनंद अशा पद्धतीने व्यक्त केला होता.

याच आठवड्यात रणबीर मुंबईतल्या एका क्लिनिकमधून बाहेर पडताना दिसला होता. त्याने फोटो काढणाऱ्यांपासून सुरक्षित अंतर राखत फोटोला पोजही दिली. यावेळचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात फोटोग्राफर्सना रणबीर विचारतो, “तुम्हा लोकांना लॉकडाऊन नाही का?” तेव्हा फोटोग्राफर्सनी त्याला आमचं काम सुरु आहे असं उत्तरही दिलं होतं.

आलिया आणि रणबीर काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. ते लवकरच एका नव्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचं नाव ‘ब्रम्हास्त्र’ असं असून अयान मुखर्जी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय हे कलाकारही दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 3:42 pm

Web Title: alia bhatt and ranbir kapoor going to maldives for holiday vsk 98
Next Stories
1 अभिनेत्याला झाली माजी पंतप्रधानांची आठवण; म्हणाला, “आठवतंय जेव्हा मनमोहन सिंग यांनी…”
2 “मी संन्यास घेतला, टक्कल केलं…” ‘आशिकी’ फेम अभिनेत्रीने शेअर केला अपघातानंतरचा हेलावून टाकणारा अनुभव
3 राजकारण आणि कलाविश्वाने वाहिली सुमित्रा भावेंना श्रद्धांजली; मुख्यमंत्र्यांचंही अभिवादन
Just Now!
X