News Flash

PHOTO : ‘राझी’मध्ये आलियाचा काश्मिरी अंदाज

'राझी'मधील आलियाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

alia bhatt
आलिया भट्ट

मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी ‘राझी’ या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या आलिया भट्टचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. आलिया यात भारतीय लष्कराला गुप्त माहिती पुरवणाऱ्या पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. पुढच्या वर्षी मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सेहमत’ या कादंबरीवर आधारित आहे.

काश्मिरी महिलेची भूमिका साकारणाऱ्या आलियाच्या या फर्स्ट लूकमध्ये तिचा काश्मिरी अंदाज सहज पाहायला मिळतोय. पारंपरिक पोशाख आणि सोनेरी रंगाचे झुमके तिच्या सौंदर्यात भर पाडत आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा लूक पोस्ट करत चित्रपट प्रदर्शनाला सहा महिने बाकी असल्याचं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं.

वाचा : ‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक- जावेद अख्तर

काही दिवसांपूर्वीच ‘राझी’चं चित्रीकरण पूर्ण झालं. करण जोहर आणि अभिनेता विकी कौशलनेही आलियाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. धर्मा प्रॉडक्शन आणि जंगली पिक्चर्सची निर्मिती असलेल्या ‘राझी’ चित्रपटात विकी कौशल आलियाच्या पतीची भूमिका साकारत आहे. ११ मे २०१८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती विकीने सोशल मीडियावर दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2017 7:42 pm

Web Title: alia bhatt first look in raazi is a perfect kashmiri beauty
Next Stories
1 ‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक- जावेद अख्तर
2 प्रभासमुळे अनुष्काने करण जोहरची ऑफर नाकारली?
3 चित्रपट प्रेक्षकांसाठी करायचा की मंत्रालयासाठी ? : रवी जाधव
Just Now!
X