News Flash

PHOTOS : आलियाने अमृतासाठी लिहिलं खास पत्र!

'राझी'च्या चित्रीकरणादरम्यान आलिया आणि अमृतामध्ये घट्ट मैत्री जमली.

अमृता खानविलकर, आलिया भट्ट

मराठी चित्रपटसृष्टीत ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अमृता खानविलकर सध्या बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये पाहावयास मिळतेय. नुकताच अमृताने ट्विटरवर १००K फॉलोअर्सचा टप्पा पार केला. यासाठी तिने आपल्या चाहत्यांचे आभारही मानले. सध्या ही अभिनेत्री मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी ‘राझी’ या चित्रपटामध्ये आलिया भटसोबत काम करत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाल्याचे अमृताने तिच्या अनेक मुलाखतीत सांगितले.

VIDEO : उर्मिलाच्या ‘बेबी शॉवर’मधील सुकन्या मोनेंचा डान्स पाहिलात का?

‘राझी’च्या चित्रीकरणादरम्यान आलिया आणि अमृतामध्ये घट्ट मैत्री जमली. ही मैत्री दिवसागणिक वाढत असल्याचे अमृता तिच्या मुलाखतींमध्ये सतत म्हणते. याचा ठोस पुरावा म्हणजे आलियाने अमृताला पाठवलेली एक भेटवस्तू! ज्यात आलियाने स्वहस्ताक्षरात एक छोटेसे आभारपत्र आणि काही सुंदर भेटवस्तू अमृताला पाठवल्या आहेत.

आलियाने पाठवलेली भेटवस्तू पाहून अमृता अगदी भारावून गेली. तिने सोशल मीडियावर या भेटवस्तूचे काही फोटो शेअर करत लिहिलं की, ‘आलियाकडून मिळालेली भेट अविस्मरणीय आहे. तसेच तिच्याकडून बरंच काही शिकण्यासारखे आहे. काही वेळा धन्यवाद मानणे पुरेसे नसते. त्यामुळे आलियाचे आभार मी कसे मानू तेच कळत नाही. तिने स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या पत्राने मी तिच्या अधिक प्रेमात पडलेय. ‘राझी’ हा माझ्यासाठी खूप छान आणि वेगळा अनुभव आहे.’

Padmavati : .. असे झाले राणीसांचे फेअरवेल!

धर्मा प्रोडक्शन आणि जंगली पिक्चर्सची निर्मिती असलेल्या ‘राझी’ चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसतील. भारत आणि पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धावर आधारित हा चित्रपट आहे. आलिया यात भारतीय लष्कराला गुप्त माहिती पुरवणाऱ्या पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 1:50 pm

Web Title: alia bhatt given special gift and handwritten letter to her raazi coactor amruta khanvilkar
Next Stories
1 पुरुषांना त्यांच्याहून अधिक प्रभावशाली महिला आवडत नाहीत- स्नेहा वाघ
2 VIDEO : उर्मिलाच्या ‘बेबी शॉवर’मधील सुकन्या मोनेंचा डान्स पाहिलात का?
3 जाणून घ्या, सिद्धार्थ-सोनाक्षीच्या ‘इत्तेफाक’ची पहिल्या दिवसाची कमाई
Just Now!
X