बॉलीवूडमधील अतरंगी पण आपल्या कामात तरबेज असलेले दोन कलाकार लवकरच एकत्र दिसण्याची शक्यता आहे. आलिया भट आणि रणवीर सिंग ही अनोखी जोडी एका जाहिरातीमध्ये एकत्र काम करत आहे.
टॅक्सी ड्रायव्हरच्या पोशाखातील आलिया आणि एका प्रवाशाच्या भूमिकेत असलेला रणवीर असा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. टॅक्सीवाल्याचा पोशाख, हातात कटींग चाय आणि डोळ्यावर गॉगल असा आलियाचा लूक आहे. तर दुसरीकडे चपट केलेले केस , खांद्यावर बॅग अशा सामान्य माणसाच्या लूकमध्ये रणवीर यात दिसतो. मात्र, हे दोघे नक्की कोणत्या जाहिरातीसाठी काम करतायंत ते अद्याप कळलेले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2016 रोजी प्रकाशित
आलिया-रणवीरचा ‘मिस्ट्री प्रोजेक्ट’
एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 15-03-2016 at 11:37 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt ranveer singh share the frame in mystery project