News Flash

आलियाच्या आवाजातील ‘राझी’मधील पहिलं गाणं ऐकलंत का?

शंकर महादेवन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला असून आलियाच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.

alia bhatt
आलिया भट्ट

अभिनयासोबतच आलिया भट्टच्या आवाजातील जादू प्रेक्षकांची मनं जिंकते. ‘हंप्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने गाणी गायली. आलियाच्या आवाजातील ‘अनप्लग्ड व्हर्जन’ लोकांना विशेष आवडल्याचंही पाहायला मिळालं. तिचा आगामी ‘राझी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून आलिया सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशनसाठी आलेल्या एका कार्यक्रमात आलियाने ‘राझी’मधलं एक गाणं गायलं. गायक शंकर महादेवन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला असून आलियाच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.

या देशभक्तीपर गाण्याचे बोल ‘ऐ वतन, वतन मेरे आबाद रहे तू’ असे आहेत. गाण्यात शंकर महादेवन यांनीसुद्धा आलियाची साथ दिली असून या व्हिडिओला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ५० हजारहून अधिक व्ह्यूज असलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.

वाचा : नियतीने त्याला बनवलं ‘बिग बॉस मराठी’चा पहिला कॅप्टन 

मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राझी’ या चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या आलियाच्या अभिनयाचा आणखी एक पैलू पाहायला मिळणार आहे. नुकताचा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. येत्या ११ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2018 10:39 am

Web Title: alia bhatt sings the first song from raazi and it will make you feel patriotic watch video
Next Stories
1 नियतीने त्याला बनवलं ‘बिग बॉस मराठी’चा पहिला कॅप्टन
2 Khichdi season 3 review: लोकांना आवडली का ही नवीन ‘खिचडी’
3 तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा ३डी स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X