News Flash

नचिकेत आणि केतकर कुटुंबीय म्हणत आहेत ‘डोन्ट रष’

केतकर कुटुंबीयांचा डान्स व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

झी युवावरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या लोकप्रिय मालिकेने नुकताच ४०० भागांचा टप्पा पार केला. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने सुरुवातीपासूनच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. या मालिकेतील अप्पा, नचिकेत आणि सई ही पात्रं तर प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य करत आहेत. तसेच मालिकेत नचिकेतची आई इरावती म्हणजेच अभिनेत्री प्रिया मराठेची एंट्री झाल्यापासून मालिकेने वेगळंच वळण घेतलं आहे.

या मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांनी वैयक्तिक स्तरावर देखील पसंती दर्शवली आहे त्यामुळे सोशल मीडियावर देखील या कलाकारांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर सध्या डोन्ट रष हा डान्स ट्रेंड चालू आहे. या गाण्यावर सगळे डान्स करून व्हिडीओ शेअर करत आहेत. ऑलमोस्ट सुफळ संपूर्णचे कलाकार ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन पण धमाल करतच असतात. त्यांनी हा ‘डोन्ट रष’चा ट्रेंड फॉलो केला आहे. त्यांचा मस्त डान्स प्रेक्षकांना या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikhil Damle (@nikhil_damle)

मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलंच आहे की केतकरांचं मराठी संस्कृतीवर किती प्रेम आहे, त्यामुळे या डोन्ट रष ट्रेन्डला देखील केतकरांनी शेवटी मराठमोळा तडका दिला आहे. या व्हिडिओच्या शेवटी लेझीमची स्टेप करून नचिकेत आणि केतकरांनी या व्हिडिओला अजून धमाल बनवलं आहे. अप्पा आणि आजी सुद्धा या व्हिडीओमध्ये तरुणांना लाजवेल अशा जोशात थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ निखिल आणि गौरीने त्यांच्या सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केला असून त्यांच्या या डोन्ट रष डान्सला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. त्यांच्या या मराठी तडका असलेल्या डोन्ट रष ट्रेंडच्या व्हिडिओवर प्रेक्षक आणि चाहते लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 5:44 pm

Web Title: almost sufal sampurnam serial team dance on dont rush avb 95
Next Stories
1 मौनी रॉयचं अखेर ठरलं! ; लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
2 प्रिया बापट आणि उमेश कामतला करोनाची लागण
3 सुहानाच्या बॉयफ्रेंडने जर तिला किस केले तर…,शाहरूखचा खुलासा
Just Now!
X